नाशिक : हिरावाडी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शनिवारी (दि़२३) सापळा रचून अटक केली़ अमोल ईश्वर पाटील (२८, रा. नागचौक) असे गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस शिपाई विशाल देवरे व स्वप्नील जुंद्रे यांना हिरावाडी परिसरात गांजा विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेच्या सुमारास फुलेनगरमध्ये सापळा रचण्यात आला. संशयिताकडे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याने कारवाईप्रसंगी मध्यवर्ती गुन्हे शाखेचीही मदत घेण्यात आली.पहाटे पाच वाजेच्या सुमारास संशयित अमोल पाटील हा दुचाकीने (एमएच १५, डब्ल्यू ४३६०) हिरावाडी रोडवरील देशी दारू दुकानाजवळ येताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले़ त्याच्याकडून ६२ हजार रुपये किमतीचा दहा किलो वजनाचा गांजा व ४० हजार रुपये किमतीची दुचाकी असा १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक एन. मोहिते, दीपक गिरमे व गुन्हे शाखेच्या आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
नाशिकमधील हिरावाडीत दहा किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:13 IST
नाशिक : हिरावाडी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शनिवारी (दि़२३) सापळा रचून अटक केली़ अमोल ईश्वर पाटील (२८, रा. नागचौक) असे गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमधील हिरावाडीत दहा किलो गांजा जप्त
ठळक मुद्देशहर गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई