शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी वाचविले दोन ट्रेकर्सचे प्राण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 17:53 IST

नाशिक : पांडव लेणी येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या व पाय घसरून पडल्याने जखमी झालेल्या दोन ट्रेकरचे प्राण जागरुक नागरिक व शहर पोलिसांच्या जलद प्रतिसाद पथकाने रविवारी (दि़११) सकाळी वाचविले़ अरविंद वैद्यनाथकन (२२, रा़प्रभूधाम, एचएएलजवळ, नाशिक) व विदुला दौलत पगार (१९, रा़पिंपळगाव बसवंत, ता़निफाड, जि़नाशिक) असे जखमी ट्रेकर्सचे नाव आहे़

ठळक मुद्देपांडवलेणी : ट्रेकींग करताना घसरला पायजागरूक नागरिक व शीघ्र कृती दल पथकाची कामगिरी

नाशिक : पांडव लेणी येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या व पाय घसरून पडल्याने जखमी झालेल्या दोन ट्रेकरचे प्राण जागरुक नागरिक व शहर पोलिसांच्या जलद प्रतिसाद पथकाने रविवारी (दि़११) सकाळी वाचविले़ अरविंद वैद्यनाथकन (२२, रा़प्रभूधाम, एचएएलजवळ, नाशिक) व विदुला दौलत पगार (१९, रा़पिंपळगाव बसवंत, ता़निफाड, जि़नाशिक) असे जखमी ट्रेकर्सचे नाव असून त्यांना प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, ट्रेकर्सला वाचविणारे जागरूक नागरिक व जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस आयुक्त सिंगल यांनी कौतूक केले आहे़

रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील जागरूक नागरिक नितीन देशपांडे, प्रविण चाकोले व अजय जाधव हे पांडवलेणी येथे ट्रेकिंगसाठी गेले होते़ एका मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने देशपांडे व त्यांच्या मित्रांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता लेणी क्रमांक एकच्या समोर सुमारे २५ फूट खाली एक मुलगा व मुलगी जखमी अवस्थेत असल्याचे दिसले़ त्यांनी तत्काळ पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांना फोन करून ट्रेकिंगसाठी युवक व युवती हे पाय घसरून पडले असून त्यांना तत्काळ मदतीची अवश्यकता असल्याचे सांगितले़ त्यानुसार सिंगल यांनी जलद प्रतिसाद पथक व नियंत्रण कक्षाद्वारे इंदिरानगर पोलीस ठाण्यास कळवून घटनास्थळी रवाना केले़ तसेच अग्निशमन विभागच व १०८ रुग्णवाहिकेस माहिती देत मदतकार्यासाठी जाण्याबाबत सांगितले़

आयुक्तांच्या आदेशानुसार जलद प्रतिसाद पथकाचे नलावडे, हिरे यांच्यासह १९ कर्मचारी तसेच इंदिरानगरचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे घटनास्थळी पोहोचले़ या ठिकाणी वैद्यनाथन व पगार हे दोघे जखमी अवस्थेत पडलेले होते़ जलद प्रतिसाद पथकाने तत्काळ या दोघांना स्ट्रेचरच्या साहाय्याने खाली आणले व १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ या दोन्ही जखमी ट्रेकर्सची विचारपूस करून सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली़ या दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना अधिक उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे़चामरलेणी येथील घटनेस उजाळानोव्हेंबर २०१७ मध्ये म्हसरूळजवळील चामरलेणी डोंगरकड्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली काही मुले अडकली होती़ या मुलांचीही शहर पोलिसांच्या निर्भया पथकाने सुखरूप सुटका केली होती़ रविवारी पांडलेणी येथे घडलेल्या या घटनेमुळे चामरलेणी येथील घडलेल्या घटनेस उजाळा मिळाला आहे़ट्रेकरचे प्राण वाचविण्यात यांचा सहभाग

शहर पोलीस आयुक्तालयातील जलद प्रतिसाद पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक टी़आऱनलावडे, पोलीस उपनिरीक्षक एस़यू़हिरे, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपनिरीक्षक गावीत, पोलीस शिपाई डी़आऱवाघ, पी़सी़पाटील, एच़जी़शर्मा, आऱटी़सिंग, व्ही़आऱवाघ, डी़व्ही़ निकम, एस़यू़माळोदे, एऩए़ढवळे, बी़बी़धरम, डी़एस़दातीर, एस़आऱनिकम, आऱपी़बहिरम, एस़डी़सपकाळे, एस़आऱबुचडे, व्ही़ए़जाधव, ए़ए़भवर, एऩए़शेख, एस़एमक़ोळी, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक एसक़े़भाले, उगले, १०८ रुग्णवाहिका तसेच वैनतेय गिर्यारोहण व गिरीभ्रमण संस्थेचे आशिष शिंपी यांचा या कामगिरीत सहभाग होता़ 

प्रशिक्षण घेऊनच करावे ट्रेकिंग

सुटीच्या कालावधीत ट्रेकिंग करण्यासाठी जाणाºया नागरिकांनी प्रशिक्षण घेऊनच ट्रेकिंग करावे़ ट्रेकिंगसाठी लागणारी संरक्षणाची साधने सोबत ठेवण्याबरोबरच एकटे व निर्जनस्थळी जाण्याचे टाळावे़ या घटनेनंतर पांडवलेणी येथे आवश्यक सुरक्षारक्षक नेमण्याबाबत पुरातत्व विभागाशी यापूर्वी पोलीस विभागामार्फत पत्रव्यवहार केला आहे़- रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस