नाशिकमध्ये पॅनकार्ड क्लब विरोधात गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:16 PM2018-01-30T17:16:07+5:302018-01-30T17:17:50+5:30

नाशिक : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांसह देशभरातील विविध ठिकाणच्या सुमारे ३५ लाख गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाºया पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात गुंतवूणकदारांच्या राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को आॅर्डिनेशन कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि़३०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ पैसे लवकरात लवकर परत मिळावेत यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात गुंतवणूकदारांनी सेबी व केंद्र सरकारचा निषेध केला़

nashik,pan,card,club,protest,collector,office | नाशिकमध्ये पॅनकार्ड क्लब विरोधात गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

नाशिकमध्ये पॅनकार्ड क्लब विरोधात गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्दे३५ लाख गुंतवणूकदार ; जिल्हाधिका-यांना निवेदन

नाशिक : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांसह देशभरातील विविध ठिकाणच्या सुमारे ३५ लाख गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या पॅनकार्ड क्लब कंपनीविरोधात गुंतवूणकदारांच्या राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को आॅर्डिनेशन कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि़३०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ पैसे लवकरात लवकर परत मिळावेत यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात गुंतवणूकदारांनी सेबी व केंद्र सरकारचा निषेध केला़
राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तिन्ही राज्यांमधील सर्व गुंतवणूकदारांनी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को आॅर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून एकत्र येत एकाच वेळी विविध ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात सेबी व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला असून गुंतवूणकदारांच्या मागण्या अर्थमंत्री अरूण जेटलींपर्यंत पोहोचविण्याचे मागणी यावेळी करण्यात आली़
पॅनकार्ड क्लबमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ३५ लाख गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ सरकारने सेबीच्या माध्यमातून कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्याचे कारवाई सुरू केली मात्र त्यानंतर पुढे कोणतीही कार्यवाही केली नाही़ तसेच आपले पैसे केव्हा परत मिळतील याची माहिती मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहे़ विशेष म्हणजे दिल्लीतील जंतर-मंतर येथे १ ते ५ जानेवारी आंदोलन करून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना मागण्यांचे निवेदनही दिले मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही़
पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांच्या मागण्यांची सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विकास कांबळे, उपाध्यक्ष प्रदीप सोनवणे, सचिव देविदास मोरे, उपसचिव पोपटराव पाटील,खजिनदार रमेश खांदवे यांच्यासह गुंतवणूकदारांनी दिला आहे़

Web Title: nashik,pan,card,club,protest,collector,office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.