शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर वाहनतोडफोडीचे सूत्रधार भाजपाचे माजी नगरसेवक सुनील खोडे यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:14 IST

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीसमधील इंदिरानगरचे भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड ही भाजपाचे माजी नगसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती सुनील खोडे यांनीच घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़

ठळक मुद्देभाजपातील अंतर्गत गटबाजी : विकासकामांच्या श्रेयवाद

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीसमधील इंदिरानगरचे भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड ही भाजपाचे माजी नगसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती सुनील खोडे यांनीच घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ भाजपा नगरसेवकांतील अंतर्गत गटबाजी व विकासकामांच्या श्रेयवादातून हा प्रकार केल्याचे समोर आले असून पोलिसांनी शुक्रवारी (दि़१३)सकाळी खोडे यांना अटक केली व त्वरीत जामीनही मंजूर केला़ दरम्यान, खोडे यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी नगरसेवक सोनवणे व कुलकर्णी यांनी केली आहे़

माजी नगसेवक सुनील खोडे

राजीवनगरमधील रहिवासी तथा प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या घराबाहेर उभी असलेल्या इनोव्हा कारच्या (एमएच १५ डीवाय ६३६०) तसेच रथचक्र चौकातील साईश्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवासी नगरसेवक दीपाली कुलकर्णी याच्या वोक्सवॅगन वेन्टो (एमएच १५ ईएक्स ६६५५) कारच्या गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केले़ दोन दुचाकींवरून आलेल्या या चार समाजकंटकांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते तसेच त्यांच्या हातात लाकडी दांडे होते़ या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या समाजकंटकांचे कृत्य परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर फुटेजच्या तपासानंतर संशयित पांडवनगरी परिसरातील असल्याचे समोर आले होते

मोहरक्या प्रीतम उर्फ डॅनी प्रकाश गोडसे

इंदिरानगर पोलिसांनी वाहन तोडफोडीतील संशयित ओमकार मैंद याच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले़ मात्र, त्यांचा मोहरक्या प्रीतम उर्फ डॅनी प्रकाश गोडसे (रा पांडवनगरी) हा फरार होता़ त्यास बुधवारी (दि११) रात्री अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत भाजपचेच माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी वाहनांची तोडफोड करण्यासाठी सांगितल्याचे पोलिसांना सांगितले़ पोलिसांनी गुरुवारी (दि़१२) पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी बाहेरगावी असल्याचे सांगितले़ मात्र शुक्रवारी (दि़१३) सकाळी आठ वाजताच इंदिरानगर पोलीस ठाण्यात स्वत:हून दाखल झाले़

इंदिरानगर पोलिसांनी केलेल्या खोडे यांच्या चौकशीतून प्रभाग क्रमांक तीसमधील भाजपा नगरसेवकांमधील अंतर्गत गटबाजी व विकासकामांच्या श्रेयवादातून हा प्रकार घडवून आणल्याचे समोर आले़ दरम्यान, भाजपाच्याच नगरसेवकांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबत सुरू असलेला श्रेयवाद, वाहनांची तोडफोड, पक्षातून हकालपट्टीची केलेली मागणी यामुळे एकंदरीतच पक्षातील अंतर्गत गटबाजीचे समोर आल्याची परिसरात चर्चा आहे़सोशल मीडीयावर खोडेंची चर्चा

वाहनांच्या तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर त्यामध्ये संशयित प्रीतम गोडसे हा स्पष्टपणे वाहनांची तोडफोड करीत असल्याचे दिसत होते़ गोडसे हा नेहमी खोडे यांच्यासोबत राहत असल्याने त्यांनीच हा प्रकार घडवून असल्याचे सोशल मीडीयावर फिरत होता़ दरम्यान वाहनांचे नुकसान झालेल्या नगरसेवकांनीही मुख्य सूत्रधाराला पकडण्याची मागणी केली होती़ खोडे यांचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाने त्यांची त्वरीत हकालपट्टी करण्याची मागणी या दोघा नगरसेवकांनी केली आहे़

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाCrimeगुन्हाPoliceपोलिस