शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी चौघा मित्रांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:54 IST

नाशिक : आडगाव शिवारातील कक़ा़वाघ कृषी महाविद्यालयातील शुभम पाटील (२०, रा़ महाबळ रोड, पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या खोलीतील चार सहकारी मित्रांविरोधात आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि़२२) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला ़ शुभमने सोमवारी (दि़१८) आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रुममधील चौघा सहकारी मित्रांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़

ठळक मुद्देचौघा सहकारी मित्रांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्यावाघ कृषी महाविद्यालयातील शुभम पाटील मूळचा जळगावचा आडगाव पोलिसांनी केला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

नाशिक : आडगाव शिवारातील कक़ा़वाघ कृषी महाविद्यालयातील शुभम पाटील (२०, रा़ महाबळ रोड, पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या खोलीतील चार सहकारी मित्रांविरोधात आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि़२२) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला ़ शुभमने सोमवारी (दि़१८) आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रुममधील चौघा सहकारी मित्रांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़मूळचा जळगावचा असलेला शुभम पाटील हा कक़ा़वाघ कृषी महाविद्यालयात मायक्रो बायोलॉजीच्या तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता. आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरातील बळीरामनगरच्या एका रो हाऊसमध्ये शुभम हा संशयित अक्षय तुकाराम आवारे, शितल लक्ष्मण कलाल, नेताजी गोरखनाथ आरोटे व कल्पेश रामचंद्र चौधरी यांच्यासमवेत रुममध्ये राहत होता़ या रुममधील पंख्याला गळफास घेऊन शुभमने आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले़ पोलिसांना शुभमचे मृतदेह हा दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता़ त्यामुळे त्याची आत्महत्या की खून याबाबत पोलिसांना संशय होता़ त्यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास सर्व विद्यार्थी वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले असता शुभम हा खालच्या खोलीत झोपला होता. सोमवारी सकाळी त्याचा शुभमचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती़ पोलिसांना शुभमने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली होती, या चिठ्ठीत लिहिलेल्या मित्रांच्या नावानुसार पोलिसांचा तपास सुरू होता़ या प्रकरणी मयत शुभमचे वडील रामभाऊ पाटील यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी त्याचे रुममधील सहकारी संशयित अक्षय आवारे, शितल कलाल, नेताजी आरोटे व कल्पेश चौधरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीPoliceपोलिसCrimeगुन्हा