शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:30 IST

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह आम्हा सगळ्यांना बदनाम करणे हा एकमेव कार्यक्रम काहींचा धंदा आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं.

नाशिक - मुख्यमंत्री ज्याप्रकारे राज्यभरात काम करतायेत त्यातून अनेकांना पोटदुखी झालीय. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यातून आता ही जागा आपल्याकडून जातेय हे लक्षात आल्यानंतर संजय राऊतांनी आरोप करणं सुरू केले आहे असा टोला शिवसेना नेते उदय सामंत यांनी खासदार संजय राऊतांना लगावला आहे. 

नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, नाशिकमध्ये उद्योजकांची, व्यापारांची बैठक होती. ज्या आघाडीला प्रतिसाद मिळत नाही त्या नेत्यांना असे आरोप करण्याचे दुरबुद्धी सुचते, काहीजण स्वत: ५-१० हजार इतरांना देतात, त्याचे शुटींग करायचे. ते पैसे महायुती वाटतेय असं करायचे. पराभव समोर दिसायला लागला तर त्याचे खापर कुणावर तरी फोडायचे हे आरोपातून दिसते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह आम्हा सगळ्यांना बदनाम करणे हा एकमेव कार्यक्रम काहींचा धंदा आहे. या निवडणुकीनंतर ते सर्व राजकीय निस्तनाबूत होणार आहेत याची चिंता करण्याचं कारण नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच राज ठाकरेंचं भाषण तुम्ही पूर्ण ऐकत नाही, त्यातील काही भाग एडिट करता. बाळासाहेबांना ज्यांनी अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला होता. तुम्हाला आरोप करण्याचा अधिकार नाही. बाळासाहेबांना अटक झाली त्यांच्यासोबत तुम्ही बसला होता. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांवर आरोप करण्याचा अधिकार नाही असा त्यातील अर्थ आहे असंही उदय सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी, पंकजा मुंडे आणि नितीन गडकरींची सभा आहे. त्यातून सुहास कांदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. सुहास कांदे हे आमचे आमदार असून ते भारती पवारांना त्यांच्या मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड मिळवून देतील यात शंका नाही असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतSanjay Rautसंजय राऊतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nashik-pcनाशिक