शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, कोल्हापूर झेडपीत भाजपाला दे धक्का; महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:03 IST

भाजपला सत्तेबाहेर करण्यात महाविकास आघाडीला यश

कोल्हापूर/नाशिक : राज्याच्या सत्तेतून भाजपला हद्दपार केल्यानंतर आता कोल्हापूर आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने भाजपला सत्तेबाहेर करण्यात यश मिळवले. सांगलीत मात्र हा फॉम्युला यशस्वी झाला नाही. शिवसेनेच्या मदतीने अध्यक्षपद राखण्यात भाजपला यश आले.कोल्हापूर जि. प. च्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील (गगनबावडा) उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील (गडहिंग्लज) यांची बहुमताने निवड झाली. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना सत्तेत असल्याचा फायदा घेत ६७ पैकी ४० मते मिळवित भाजपने अध्यक्षपद मिळविले होते; मात्र राज्यातील सत्तांतरानंतर मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांनी पुढाकार घेत जोडण्या लावल्या आणि शिवसेनेच्या सर्व म्हणजेच १० सदस्यांना एकाच छताखाली आणले; त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांना हालचाल करता आली नाही.नाशिक जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने एकत्र येऊन अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड या दोघांची बिनविरोध निवड केली. गेल्या वेळी सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या उमेदवारांनी संख्याबळ जुळत नसल्याचे पाहून माघार घेतल्याने या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली आहे. महाविकास आघाडीला माकप व अपक्षांनीही पाठिंबा दिला.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा