शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Nashik Bus Accident: अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 08:37 IST

औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला.

नाशिक - औरंगाबाद रोडवरील भीषण अपघातात होरपळून जीव गेलेल्या १० प्रवाशांच्या वारसांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही घटनास्थळी पोहचून आढावा घेतला. टँकर आणि बस या धडकेत बसला भीषण आग लागली. त्यात १० प्रवाशांचा जीव गेला तर २१ जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने चालली होती तर नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या टँकरमध्ये धडक झाली. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार आहेत अशी माहितीही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

 

कसा झाला अपघात?औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने जवळपास १० प्रवासी होरपळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे प्रवासी जळून खाक झाले. सदर अपघातानंतर बस ५० ते ६० फूट पुढे घसरत गेली तर टँकर ७० ते ८० मीटर पुढे जाऊन  टॅंकर रस्त्याच्या कडेला थांबला. सदर अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकी देखील धाव घेतली तसेच पोलिसांना देखील कळविले मात्र पोलीस वेळेच घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ३८ प्रवासी बसमध्ये होते. त्यापैकी १० प्रवशी होरपळून ठार झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. १० मृत झाले असून सर्व पुरुष असल्याचे प्रशासनाने सांगितले. यामध्ये एक मृतकाची कवटी फक्त आढळून आली. ती लहान मुलाची असू शकते असे पोलिसांनी सांगितले.

दैव बलवत्तर म्हणून बचावलोपहाटेच्या सुमारास आम्ही सगळे लक्झरी बस मध्ये झोपलेला असताना अचानक मोठा आवाज झाला आणि बस संपूर्णपणे आगीत सापडली होती. यावेळी कसेबसे मी माझ्या लेकीसह बसमधून जीव वाचून बाहेर पडले माझे नशीब चांगले म्हणून मी आणि माझी लेक बचावलो - अनिता चौधरी, (रा. लोणी, जि.वाशीम)

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNashikनाशिकAccidentअपघात