शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

Chandrakant Patil : अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदींनीच राष्ट्रपती केलं; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 9:06 AM

Narendra Modi did APJ Abdul Kalam as president he didn't let go Muslims said BJP leader Chandrakant Patil : नरेंद्र मोदी यांनी सर्व मुस्लिमांना प्राधान्य दिलं. त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, पाटील यांचं वक्तव्य

ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांनी सर्व मुस्लिमांना प्राधान्य दिलं, कलाम यांना राष्ट्रपती केलं, पाटील यांचं वक्तव्यमहापुरुषांचं कर्तुत्व समजण्याची तरुणांना गरज : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम  Abdul Kalam यांना राष्ट्रपती केलं होतं, असा दावा त्यांनी केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात त्यांनी हे अजब वक्तव्य केलं."नरेंद्र मोदी यांनी सर्व मुस्लिमांना प्राधान्य दिलं. त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं. ते काय मुस्लीम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नाही. एक कर्तुत्ववान म्हणून, एक संशोधक म्हणून त्यांना राष्ट्रपती केलं," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.मुस्लीम महिलांच्या पायात बेड्या होत्या. त्या तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाकचा कायदा केला. बिहारमध्ये निवडणुकांत जो विजय मिळाला त्याचं विश्लेषण करा. रांगेनं मुस्लीम महिलांनी मोदींना मतदान केलं. आमच्या पायातील बेडी तुम्ही तोडली. नाही तर आमचा पती तलाक म्हणून आम्हाला बाहेर काढायचा. तुम्ही कायदा केला असं तेथील महिला म्हणत होत्या. बिहारमध्ये मुस्लीम बहुल भागात२९ पैकी १४ जागांवर भाजपला विजय मिळाला. तर मुस्लीम महिलांनीही आपल्या पतीला सांगितलं तुम्हाला जे काही करायचं ते करा आम्ही मोदींनाच मतदान करणार आहोत, असं पाटील यांनी नमूद केलं.  महापुरुषांचं कर्तुत्व समजण्याची गरज"छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या महापुरुषांचं कर्तुत्व समजून घेण्याची गरज आहे. समाजात असलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याचा तरुणांनी विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यात तरूणांचं मोठं योगदान होतं. तसंच योगदान आजही युवकांनी द्यावं. या पिढीला खरा इतिहास सांगण्याचं तसंत इतिहास, राष्ट्र आणि संस्कृतीशी जोडण्याचं काम युवा मोर्चा करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.  

टॅग्स :APJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलामBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे