शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

नारायणपूरात महाप्रसादामुळे विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2016 02:14 IST

दोन जण अत्यवस्थ; ८0 रुग्णांवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार.

खामगाव/नांदुरा(जि. बुलडाणा), दि. १५- गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील निमगावनजीक असलेल्या नारायणपूर येथे आयोजित भंडार्‍यात महाप्रसाद घेतल्यानंतर सुमारे ८0 जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. या रुग्णांवर नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गणेशोत्सवादरम्यान नारायणपूर येथे १४ सप्टेंबर रोजी गावकर्‍यांनी महाप्रसादाचे आयोजन दुपारी केले होते. या महाप्रसादामध्ये पोळी, काशिफळाची भाजी, वरण, भात असे पदार्थ ठेवण्यात आले होते. नारायणपूर तसेच नजीकच्या निमगाव येथील सुमारे ४00-५00 लोकांनी दुपारच्या सुमारास हा महाप्रसाद घेतला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेदरम्यान महाप्रसाद घेतलेल्या काही ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे यासारखे त्रास जाणवू लागल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचारासाठी धाव घेतली. मळमळ व उलट्या होणार्‍यांची संख्या वाढत गेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर समाजसेवी संस्था, त्यांच्या रुग्णवाहिका, कार्यकर्ते यांनी तत्काळ दवाखान्यात धाव घेऊन मदत केली. घटनेचे वृत्त कळताच आ.चैनसुख संचेती यांनीही तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांना धीर दिला. ८0 रुग्णांना रात्री १0 वाजेपर्यंत खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णांलयात उपचारासाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, आ.अँड.आकाश फुंडकर यांनी तातडीने सामान्य रुग्णालयात धाव घेतली व रुग्णांची विचारपूस केली तसेच उपचाराबाबत डॉक्टरांकडून आढावा घेतला. रुग्णांची वाढती संख्या पाहता सामान्य रुग्णालयातील नियुक्त सकाळ पाळीतील डॉक्टरांनासुद्धा बोलविण्यात आले. यावेळी या रुग्णांवर सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश सिरसाट, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश टापरे, डॉ.नाईक, डॉ.गोरे, डॉ.सोनटक्के, डॉ.हर्षल नारखेडे आदींनी तातडीने उपचार केले. दरम्यान, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, कृउबास सभापती संतोष टाले, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनीही सामान्य रुग्णालयात भेट देत रुग्णांची विचारपूस केली. या रुग्णांना सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रसंगी सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीसुद्धा रुग्णसेवेत मोठा हातभार लावला.