मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:40 IST2025-10-29T10:39:54+5:302025-10-29T10:40:56+5:30
Narayan Rane statement on Shiv sena: भाजप खासदार नारायण राणे यांचे खळबळजनक विधान, म्हणाले, 'बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती'. पुत्र निलेश राणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असताना वक्तव्य. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण.

मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
भाजप खासदार, माजी मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना आज राहिली नाही, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. राणे मंगळवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी केली जात आहे. यामध्ये एकनाथ शिंदेशिवसेना आणि भाजपा वेगळे लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर राणे यांनी हे वक्तव्य केले असून एकप्रकारे एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील बाळासाहेबांची नाही, याकडेचे राणे यांचा रोख असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
१५ व्या वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 39 ते 40 वर्षं शिवसेनेत काम केले. बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती. बाळासाहेबांनंतर शिवसेना आज राहिली नाही, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. तुमच्याप्रमाणे मी देखील शिवसेना सोडून भाजपात आलो. याच मतदारसंघातून खासदार म्हणून लोकांनी मला निवडून दिले, असे राणे म्हणाले.
घरातच 'मैत्रीपूर्ण' लढतीचे संकेत
मुख्य म्हणजे राणे यांचे ज्येष्ठ पूत्र निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे हे आपली शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना असे दावे करत आहेत. अशा परिस्थितीत रत्नागिरीतील शिवसेनेच्या उदय सामंत बंधूंविरोधात स्थानिक निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी आलेले राणे आजची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, असे म्हणत आहेत. सिंधुदूर्गमध्ये नितेश राणे भाजपा वि. निलेश राणे शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य..
केवळ भारतातच नाही तर जगात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ११ वर्षांपूर्वी ते जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भारताची अर्थव्यवस्था १४ व्या क्रमांकावर होती. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे, असे राणे म्हणाले.