शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नानाजी, जरा ज्यादेही लंबी झाड दी भैय्या!

By admin | Updated: March 4, 2015 02:41 IST

आपलं वय काय, आपला अधिकार काय, आपण कोणाविषयी बोलतो, काय बोलतो, हे असले टुक्कार प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या मर्त्य मानवांसाठी.

हेमंत कुलकर्णी- नाशिकआपलं वय काय, आपला अधिकार काय, आपण कोणाविषयी बोलतो, काय बोलतो, हे असले टुक्कार प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या मर्त्य मानवांसाठी. नानाला म्हणजे नाना पाटेकरांना हे प्रश्न पडण्याचे कारण नाही. आपली प्रतिमा मुळात त्यांनी स्वत:च उटपटांग अशी सिद्ध करुन ठेवलेली. त्यातून नाना वाक्यं प्रमाणम असे मानणारा एक भक्तगणदेखील भोवती गोळा करुन ठेवलेला. या भक्तांमधीलच काही लबाड खासगीत मात्र म्हणणार, नाना म्हणजे एक नंबरचा फेकू! पण परवा नाशकात आणि तेही थेट कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी व त्यातही पुन्हा तात्यांच्याच ‘नटसम्राट’च्या महेश मांजरेकरांच्या पौरोहित्याखाली होऊ घातलेल्या चित्रपटीकरणाच्या मूहूर्तप्रसंगी नानानी जी काय फेकलीय म्हणताय की ज्याचे नाव ते! ती फेकी ऐकल्यानंतर केवळ एकच प्रश्न निर्माण झाला, ‘नाना, ऐसा नही लागे के जरा ज्यादेही लंबी झाड दी आपने’? मुहूर्त म्हणून नानानी नटसम्राटमधील स्वगत आपल्या खर्जभऱ्या आवाजात म्हणून दाखविले, ऐकणाऱ्यांच्या डोळ्यातून झरझरा पाणी वाहू लागले. इथपर्यंत सारे बैजवार. त्या बाबतीत नानात काही ऐब शोधायचे कारण नाही. फार तर म्हणता येईल, बावा, तुमने पढके दिखाया, वो ठीक है, मगर वैसा गर लिखाही नही गया होता, तो? बहुधा वाचता वाचताच हा प्रश्न नानाच्याही डोक्याच्या मागील बाजूच्या लहान मेंदूला स्पर्शून गेला असावा आणि त्यानंतरच मग नानानी अशी काय सॉलीड फेकली, की ऐकणारे सारे एकाचवेळी गर्भगळीत, सुन्न, आश्चर्यमूढ आणि गपगार!‘निलू व तात्या मित्र-मैत्रीण. ते तिच्याशी नटसम्राटबद्दल चर्चा करायचे, नटसम्राट लिहिताना त्यांनी आपले कच्चे लेखन निलूला वाचून दाखविलं आहे. त्यावेळी ती म्हणायची, नाही हो तात्या, हे फारच कमर्शियल झालं. मग काय तात्याही त्यावर विचार करीत ते फाडून टाकायचे. असे अनेक कागद तात्यांनी फाडून टाकल्याचं निलू सांगते. मग दुसरा एखादा संवाद तात्या वाचून दाखवत. मग ती जेव्हां त्याला छान म्हणे, तेव्हां ते तिला मुद्दामच विचारायचं, ठेवू? तीही म्हणे, ठेवा. मग तात्या तो संवाद ठेवत. अशी माझी नटसम्राटची आठवण.तेव्हां तर मी तिचा नवराही नव्हतो. पण कुठेतरी या नाटकाशी आणि तात्यांशी संबंध जुळायचा होता तो असा’!नानाच्या या कपोलकल्पित स्वगतातील पात्र परिचय असा: निलू म्हणजे नीलकांती हलदुले म्हणजे तात्यांची मैत्रीण आणि विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे श्रेष्ठ कवी आणि नाटककार उर्फ निलूचा मित्र. या मित्र-मैत्रिणीचा नाट्यमय संवाद होत होता (?) तेव्हां नाना तिचा नवरा नव्हता. म्हणजे तिने लग्नानंतर व काही काळ नीलकांती पाटेकर असताना, नवऱ्याला सांगितलेला वा न सांगितलेला हा किस्सा. म्हणजेच या किश्श्याच्या खरे खोटेपणाबाबत नानाच्या कानाला सात पाळ्या. पकडायचेच झाले तर तिला पकडा, आपल्याला नाही, ही नानाची अ‍ॅलिबी. नटसम्राटचा पहिला प्रयोग २३ डिसेंबर १९७० रोजी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला. याचा अर्थ या नाटकाच्या संहितेचे म्हणजे लेखनाचे काम त्याच्या किमान वर्ष दोन वर्ष आधीपासून सुरु झाले असणार. नीलकांती हलदुले यांचा जन्म फेब्रुवारी १९५५ चा. म्हणजे नटसम्राट रंगमंचावर आले, तेव्हां ‘निलू’ पंधरा वर्षांची व त्याच्याही दोन वर्षे आधी म्हणजे तेरा वर्षांची. म्हणजे परकरी पोर. ती तात्यांची मैत्रीण असायला कोणाचीच काही हरकत नाही. पण जणू ती मुक्ताई आणि तात्या माऊली. अरे, किती फेकाल रे?नटसम्राटची संहिता पॉप्युलर प्रकाशनाने १९७१ साली प्रसिद्ध केली. या संहितेच्या पाचव्या पानावर खुद्द तात्यांनी आभार नावाचे दोन छोटे परिच्छेद लिहिले आहेत. त्यातील दुसऱ्या परिच्छेदात ते म्हणतात,‘नाटकाच्या लेखनास आणि प्रयोगास नाटककार वसंतराव कानेटकर, गोवा हिन्दू असोसिएशनचे रामकृष्ण नायक, अवधूत गुडे, चित्रकार दलाल, भिकू पै-आंगले आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर या मित्रांनी नाना प्रकारचे सहाय्य केले. त्यांचा ऋणभार नटसम्राटच्या मस्तकावर आहे. आपल्या मनातील चित्र रंगमंचावर यथार्थ रुपात पाहण्याचे समाधान लेखकाला क्वचितच मिळते. डॉ.श्रीराम लागू या प्रतिभाशाली कलावंताने हे दुर्मिळ समाधान मला दिले आहे. त्यांचे आणि नाट्य साकार करणाऱ्या अन्य सर्व कलावंतांचे व तंत्रज्ञांचे मी मन:पूर्वक आभार मानतो’या संपूर्ण परिच्छेदात तात्यांनी त्यांची बालमैत्रीण (बाळपणापासूनची या अर्थी नव्हे) निलू हिचा ओझरतादेखील उल्लेख केलेला नाही. नानाने समोरच्या अजाणकारांच्या पुढ्यात जी अरबी सुरस आणि सुरम्य कथा सांगितली ती खरी असती तर तात्यांनी कुठे तरी निलूचा जरुर उल्लेख केला असता. तो केला नाही म्हणजे तात्याराव कृतघ्न वगैरे म्हणायचे की काय?सर्वात महत्वाचे म्हणजे तात्यासाहेब नेहमी त्यांच्या मेजावर ठेवलेल्या फिकट निळसर अर्ध आकाराच्या कागदावर अगदी सुवाच्च अक्षरात लिहीत असत. कुठेही खाडाखोड नाही की कागद टराटरा फाडून टाकणं नाही. कागदाला पेन टेकवण्यापूर्वी सारी जुळणी अगोदरच त्यांच्या मनात झालेली असे. तात्यांच्या सहवासात राहिलेला कोणीही याची साक्ष देऊ शकेल. अर्थात तात्यासाहेबांच्या संदर्भात बोलायचे तर आता नाना पाटेकर हा एकमात्र अपवाद आहे म्हणावे तर तसेही नाही. तात्या आता हयात नाहीत. त्यामुळे खरे-खोटे कोण करणार, तेव्हां द्या ठोकून त्यांच्या नावे काहीही, असा अनुभव बऱ्याचदा येत असतो. पण तात्यांना ओळखणारे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे तात्या स्वत: ज्यांना ओळखायचे व ओळखूनही असायचे, असे काही जण अजून शिल्लक आहेत. त्यांच्या तसबिरींना अद्याप हार लटकले जायचे आहेत. त्यामुळे जोवर यातील अखेरचा मोहरा गळून पडत नाही तोवर तरी, ‘नाना न मारो, झूटे रंग की पिचकारी, चुनरी न मोरी रंग लायेगी’!