शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 07:06 IST

ज्या अबुझमाडमधून तो नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व करीत होता, तेथेच त्याच्या कारकिर्दीचाही अखेर झाला.

गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात आश्रय घेऊन देशातील प्रमुख नक्षलवादी कारवायांना कृतीत उतरविणारा आणि चार राज्यांच्या पोलिस यंत्रणेसह राष्ट्रीय तपास यंत्रणेला आव्हान देणाऱ्या नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू (७०) याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तब्बल ४५ वर्ष त्याने नक्षलवादी चळवळीला दिले. यादरम्यान त्याला केवळ एकदाच अटक झाली हाेती. ज्या अबुझमाडमधून तो नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व करीत होता, तेथेच त्याच्या कारकिर्दीचाही अखेर झाला.

अबुझमाडमध्ये मंगळवारी ५०० हून अधिक डीआरजी आणि सुरक्षा जवानांनी नक्षलविराेधी माेहीम राबविली. यावेळी उडालेल्या चकमकीनंतर जंगलात २७ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. त्यात बसवा राजूचाही समावेश होता. त्याच्यावर विविध राज्यांंमध्ये पाच काेटींचे बक्षीस हाेते, शिवाय एनआयएने  दहा लाखांचे बक्षीस त्याच्यावर ठेवले हाेते. बसवा राजूसोबत आणखी काही माेठे कॅडर ठार झाल्याची माहिती असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

एकदाच झाली होती अटक१९८० मध्ये श्रीकाकुलम येथे रॅडिकल स्टुडंट्स युनियन (आरएसयू) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष झाला. तेव्हा बसवा राजू यास फक्त एकदाच अटक करण्यात आली होती.

जिलेटिनचे प्रशिक्षणआंध्र प्रदेशात जेव्हा सीपीआय (एमएल) पीपल्स वॉरची स्थापना झाली तेव्हा बसवा राजू प्रमुख संघटकांपैकी एक होता. त्याने जहाल नक्षली नेता मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी, मल्लोजुला वेणुगोपाल आणि मल्ल राजी रेड्डी यांच्यासोबत बस्तरच्या जंगलात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) च्या माजी सैनिकांकडून १९८७ मध्ये जिलेटिन हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. त्याच्याकड लष्करी रणनीती आणि स्फोटकांचा वापराचे विशेष कौशल्य होते.  

बी. टेकनंतर मिळविले लष्करी रणनीतींवर प्रभुत्व बसवा राजू आंध्र प्रदेशातील जियान्नापेट (जि.श्रीकाकुलम) गावचा. त्याने वारंगल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक उत्तीर्ण केले. महाविद्यालयीन जीवनापासूनच तो डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय होता. अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्याने लष्करी रणनीतींवर प्रभुत्व मिळवले होते.

दुसरा सरचिटणीसनक्षलवादी संघटनेचा बसवा राजू हा दुसरा सरचिटणीस आहे. १० नाेव्हेंबर २०१८ राेजी मुपल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्या राजीनाम्यानंतर ताे सर्वाेच्च नेता बनला.वेशभूषा बदलून करायचा हल्ले : पोलिसांनुसार, नंबाला केशव राव हा कृष्णा, विनय, गंगान्ना, प्रकाश, विजय, केशव, बीआर, उमेश, राजू, दरपू, नरसिंम्मा, अशा १५ नावांनी चळवळीत ओळखला जायचा. भूमिगत राहून सूत्रे फिरविण्यात ताे माहीर हाेता.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDeathमृत्यूSoldierसैनिक