Nagpur Winter Session: एकनाथ शिंदेंचा भूखंड घोटाळा भाजपने समोर आणला; अजित पवारांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 13:39 IST2022-12-23T13:39:12+5:302022-12-23T13:39:51+5:30
हिवाळी अधिवेशनात नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Nagpur Winter Session: एकनाथ शिंदेंचा भूखंड घोटाळा भाजपने समोर आणला; अजित पवारांचा दावा
Nagpur Winter Session: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट(NIT)च्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्र्यांनी न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.
भाजपने तो घोटाळा बाहेर आणला
नागपुरात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ज्या भूखंडाबाबत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे, तो भूखंड घोटाळा सर्वात आधी भाजप नेत्यांनी समोर आणला होता. त्यांच्यातल्याच काही लोकांनी पीआयएल दाखल केली होती,'' असं पवार म्हणाले.
जयंत पाटलांचे निलंबन अयोग्य
ते पुढे म्हणाले की, ''सत्ताधाऱ्यांची सहा महिन्यांपासून मुजोरी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी उचलून धरल्या जातात तर विरोधकांच्या दाबल्या जातात. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत पक्षांनी समंजस भूमिका घेतली पाहिजे. जयंत पाटलांनी अपशब्द वापरला नाही. जयंत पाटलांवरील कारवाई अयोग्य आहे,'' असा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.