शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 8:56 AM

Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe Tests Corona Positive : संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन; तुकाराम मुंढे वर्क फ्रॉम होम करणार

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसत नसली, तरी आमचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. गेल्या १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन मुंढेंनी केलं आहे.तुकाराम मुंढेंनी थोड्याच वेळापूर्वी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. आपण आयसोलेशनमध्ये असून नागपूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी घरातूनच काम करणार असल्याचं मुंढेंनी सांगितलं आहे. आपण जिंकू असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यातील एका अटेन्डंटची दोन दिवसांपूर्वी चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आला. यामुळे सोमवारी मुंढे यांच्या कुटुंबासह बंगल्यातील सात लोकांचे नमुने घेऊन मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यात मुंढे यांचा नमुना पॉझिटिव्ह आला. तर इतर सहा लोकांचे नमुने निगेटिव्ह आले. त्यांच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकही पॉझिटिव्ह आल्याचे आता पुढे आले आहे. मुंढे यांना लो व्हायरस लोडमेयोने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मनपा आयुक्त मुंढे यांच्या ‘आरटी-पीसीआर’ चाचणीत ‘लो व्हायरस लोड’ असल्याचे निदान झाले. त्यांनी तातडीने तपासणी केल्याने आजार पसरण्याचा धोका कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांना कुठलेही लक्षणे नाहीत. यामुळे होम आयसोलेशनचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मुंढेंकडून विशेष पथकाची स्थापनाकोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि कोरोना बाधितांची लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथक स्थापन केलं आहे. नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेनं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. मनपाचं विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढे