शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
2
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
4
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
5
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
6
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
7
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
8
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
9
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
10
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
11
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
12
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
13
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
14
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
15
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
16
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
17
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
18
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
19
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
20
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Monsoon Session: ऑरेंज सिटीत आले संभाजी भिडेंच्या शेतातील आंबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 12:01 IST

संभाजी भिडेंच्या अजब विधानाची खिल्ली

नागपूर: विधीमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. संभाजी भिडेंच्या अटकेच्या मुद्यावरुन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. हा मुद्दा उचलून धरण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी अनोख्या मार्गाचा वापर केला आहे. ते संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधीमंडळ परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांच्या हातात आंब्याची टोपलीदेखील होती. माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं अजब विधान संभाजी भिडेंनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका कार्यक्रमात केलं होतं. त्या विधानाचा त्यावेळी अनेकांनी समाचार घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश गजभिये विधीमंडळ अधिवेशनात टोपलीतून आंबे घेऊन आले. गजभिये यांच्या हातातील आंब्याची टोपली अनेकांचं लक्ष वेधून घेत होती. गजभिये यांनी या आंब्यांवर 'संभाजी भिडेंच्या शेतातील आंबे' असं लिहिलं होतं. हे वाचून अनेकांना हसू आवरता आलं नाही. पावसाळी अधिवेशनात संभाजी भिडेंच्या अटकेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. भिडे यांच्या वेशभूषेत आलेल्या आमदार गजभिये यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. 'संभाजी भिडे यांच्याविरोधात सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांना आतापर्यंत अटक व्हायला हवी होती. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. मनुस्मृती ही पहिली राज्यघटना होती, असं संभाजी भिडे म्हणतात. आम्हाला मिळालेले अधिकार हे मनूनं दिले आहेत की संविधानानं दिले आहेत, हे सरकारला विचारण्यासाठी मी या वेशभूषेत आलो आहे,' असं प्रकाश गजभिये यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.  

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी