शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये आयकर अधिकाऱ्यांची बोगस टोळी पकडली

By admin | Updated: August 23, 2016 23:29 IST

आयकर अधिकारी असल्याचे सांगून उद्योजक व भ्रष्ट अधिकाऱ्यांसह अनेकांना लुटणाऱ्या बोगस आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीचा वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

तिघांना अटक : वाशिम पोलिसांची नागपुरात कारवाई

नागपूर : आयकर अधिकारी असल्याचे सांगून उद्योजक व भ्रष्ट अधिकाऱ्यांसह अनेकांना लुटणाऱ्या बोगस आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीचा वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीच्या तीन सदस्यांना नागपुरातुन ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ही टोळी नागपुरातील आहे. त्यांचे सहा ते सात सहकारी फरार आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सुरेश सुरेंद्र कोहळे (२९) पोलीस लाईन टाकळी, प्रकाश अशोक आष्टीकर (४५) रामनगर, अंबाझरी, संदीप रत्नाकर देशमुख (४९) अंबाझरी यांचा समावेश आहे. संदीप शिक्षक असून, तो खासगी शिकवणी घेतो.टोळीत आठ ते दहा सदस्य आहेत. टोळीचे सदस्य चारचाकी वाहनांमध्ये व्यापारी, राजकीय नेता व अवैध धंद्यांमध्ये समाविष्ट असलेल्यांचा शोध घेतात. टार्गेट केलेल्या व्यक्तीकडे अधिकाऱ्यांसारखा पेहराव करून जातात. आयकर अथवा सीबीआयच्या स्पेशल टीमचे सदस्य असल्याचे सांगून घराची झडती घेतात. संधी मिळताच रुपये, दागिने आणि किमती सामान घेऊन पळ काढतात. या टोळीने ९ आॅगस्टला सकाळी ८.३० वाजता वाशिम जिल्ह्यातील सोपान कंवर यांच्या घरी धाड टाकली. स्वत:ला आयकर विभागाच्या स्पेशल टीमचे सदस्य असल्याचे सांगितले. सोपान कंवर हे बिल्डर आहे. त्यांनी या टोळीकडून आयकर विभागाच्या संबंधित कागदपत्राची मागणी करीत, घराची झडती देण्यास नक ार दिला. परंतु आरोपी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून घराची झडती घेऊ लागले. कंवर यांनी आरोपींकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यांच्याकडे कुठलेही दस्तावेज नसल्याने, कंवर यांनी आयकर विभागाचे अधिकारी व त्यांच्या सीएला फोन केला. आरोपींच्या हे लक्षात येताच त्यांनी ‘दुसऱ्या जागी छापा मारायचा आहे’ असे सांगून तेथून पसार झाले. ते गेल्यानंतर कंवर यांनी आयकर अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन प्रकरणाची माहिती दिली. आयकर विभागाने कुठल्याही टीमला पाठविले नसल्याचे सांगितले. त्यामुळे कंवर यांनी वाशिम पोलिसात तक्रार केली. पोलिसांच्या तपासात आरोपीजवळ असलेल्या कारचा नंबर मिळाला. कारच्या नंबरच्या आधारावर वाशिम पोलीस २० आॅगस्टला नागपुरात पोहचले. आरोपींना ताब्यात घेऊन सोबत घेऊन गेले. ही कारवाई वाशिमचे पोलीस पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली.