शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

एन. डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’

By admin | Updated: January 9, 2017 20:25 IST

यंदाचा ‘सांगली भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार असल्याची माहिती येथील विश्वजागृती

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 09 -  यंदाचा ‘सांगली भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार असल्याची माहिती येथील विश्वजागृती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी सोमवारी दिली. पंचवीस हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.विश्वजागृती मंडळातर्फे गेल्या १९ वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाºया व्यक्तीस ‘सांगली भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार आहे. पुरस्कार प्रदान समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.प्रा. डॉ. पाटील यांचा जन्म ५ जुलै १९२९ रोजी ढवळी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एल.एल.बी (पुणे विद्यापीठ) असे शिक्षण पूर्ण केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे त्यांच्यावर संस्कार झाले. या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन प्रा. डॉ. पाटील यांनी १९५४ ते १९५७ या काळात सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अध्यापन केले. १९६० मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या एकतिसाव्यावर्षी इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य, सिनेट सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नंतर कार्यवाह, राज्य प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.दरम्यान, १९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले. १९८५ ते १९९० ते विधानसभेचे सदस्य, तर अठरा वर्षे ते विधानपरिषदेचे सदस्य होते. १९७८-८० या काळात राज्याचे सहकारमंत्री म्हणून त्यांनी कामाचा स्वतंत्र ठसा उमटवला. एकाधिकार कापूस खरेदी योजना सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनीच घेतला. स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ (नांदेड), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ यांनी सन्माननीय डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. प्रख्यात आणि प्रभावी वक्ते म्हणून प्रा. डॉ. पाटील यांची ओळख आहे. शेतकरी, कामगार, शोषित यांच्या अनेक लढ्यांचे नेतृत्व त्यांनी केले. आज वयाच्या ८८ व्या वर्षीही ते शेतकरी आणि सामान्यांच्या आंदोलनात अग्रभागी असतात.