शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माझे भांडण तुमच्या वडिलांशी; माझा मुलगा त्यांच्याबद्दल बोलतोय असे कदापि होणे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:00 IST

रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैर प्रसिद्ध असून त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत राहिला आहे. मात्र कटुतेची रेषा पुसट करण्याचे काम जाधव यांनी सभागृहात बोलताना केले.

मुंबई : माझे भांडण तुमच्या वडिलांशी आहे, ते सुरूच राहील पण माझा मुलगा तुमच्या वडिलांविरोधात काही बोलतोय असे घडणे नाही, असे विधान करत उद्धवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे पुत्र राज्यमंत्री योगेश कदम यांच्याविषयी बुधवारी विधानसभेत सकारत्मक टिप्पणी करत कटुता कमी झाल्याचे संकेत दिले. रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैर प्रसिद्ध असून त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत राहिला आहे. मात्र कटुतेची रेषा पुसट करण्याचे काम जाधव यांनी सभागृहात बोलताना केले. ते म्हणाले, योगेश काल मला भेटला, हो सभागृहाबाहेर मी त्याला अरे कारेच म्हणणार. आज सभागृहात ते आहेत तेव्हा ‘अरे कारे’ म्हणणार नाही. तुमचे वडील आणि माझे भांडण राहील, ते राजकारण आहे, ते आम्ही करत राहू. ते आमच्या पाचवीलाच पूजलेले आहे, पण तुमच्या विषयी अशी भावना माझ्या मनात नाही, असे म्हणत जाधव यांनी कदम कुटुंबाशी असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मुंबईसह कोकणचे ७५ आमदार, मंत्री आहेत, त्यांनी कोकणच्या प्रश्नांवर सातत्याने एकत्र आले पाहिजे असे आवाहन जाधव यांनी केले. 

दरम्यान, कोकणला २० हजार कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने द्यावी आणि त्यातून स्थानिक समस्या सोडवाव्यात अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी चर्चेत केली त्यात संजय केळकर मनीषा चौधरी बाळा नर, सुनील प्रभू यांनी कोकणातील विविध प्रश्न मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.

सचिवालयावर रोखविधिमंडळ सचिवालय राजकीय भेदभाव कधीपासून करायला लागले, असा सवाल करत भास्कर जाधव म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मी मागणी केली होती की विधानसभेत कोकणासंदर्भात चर्चा होण्यासाठी प्रस्ताव आला पाहिजे.

ती मान्य करण्यात आली व तसे मला कळविले गेले पण नंतर मला असे कळाले की विधानमंडळ सचिवांनी असा सल्ला दिला की, विरोधकांचा प्रस्ताव आला तर ते सरकारवर टीका करतील.

त्यामुळे सत्ताधाऱ्यांचाही प्रस्ताव घेण्यात आला जेणेकरून त्यामध्ये सदस्य सरकारच्या बाजूने बोलू शकतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : My fight with your father, son won't speak against him.

Web Summary : Bhaskar Jadhav softened stance towards Ramdas Kadam's family in assembly. Despite political rivalry with the father, he assured no animosity towards the son, Yogesh, advocating for united efforts on Konkan issues. He criticized secretariat bias, urging Konkan development with ₹20,000 crore aid.
टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवRamdas Kadamरामदास कदमShiv Senaशिवसेना