"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 22:50 IST2025-04-14T22:50:04+5:302025-04-14T22:50:38+5:30

तुम्ही माहूरला जा, तुम्ही तुळजापूरला जा, तुम्ही अक्कलकोटला जा, मी सर्वप्रथ धार्मिकस्थळं पूर्ण केली. यात, राम वन गमन यात्रा, हा ८ हजार कोटींचा मार्ग ५५ टक्के पूर्ण झाला. राम-जानकी मार्ग नेपाळपर्यंत नेलाय तो ४७ टक्के पूर्ण झालाय. अयोध्येच्या रिंग रोडचेकाम सुरू झाले आणि बौद्ध सर्किट म्हणून मी सिमेंटचा २२ हजार कोटीरुपयांचा मार्गही मी पूर्ण केला. अशा अनेक कामांची माहती यावेळी गडकरी यांनी दिली...

My mother had told me, Nitin, make this road good Gadkari shared his mother's wish | "माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा

"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा

मी जवळपास १० लाख कोटी रुपयांचे द्रुतगती महामार्ग बांधत आहे.  त्यांची संख्या ५७ आहे. आधी जसे राष्ट्रीय महामार्ग होते, तसे आता अॅक्सीस-कंट्रोल एक्सप्रेस महामार्ग आहेत. त्यामुळे आपल्याला रोडवर अडचणी येणार नाहीत. तसेच, आम्ही ४६० किलोमिटरचे अडीच लाख कोटी रुपयांचे १७८ टनेल्स बांधण्यासाठी घेतले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली. ते दादर येथील अमर हिंद मंडळच्या ७८व्या वसंत व्याख्यानमालेत बोलत होते. गेल्या काही वर्षांत देशातील पायाभूत सुविधा आणि दळवळणासंदर्भात झालेल्या विकास कामांसंदर्भात ते बोलत होते. यावेळी त्यांनी, आपल्या आईने इच्छा व्यक्त केलेल्या एका रस्त्यासंदर्भातही माहिती दिली. 

गडकरी म्हणाले, "एक महत्वाचे म्हणजे, माझी आई मृत्यूपूर्वी, गाणगापूरला गेली होती. ती मला म्हणाली होती की, नितीन एवढा रस्ता खराब आहे रे. माझी पाठ खिळखिळी झालीय. आता मला नाही वाटत, मी पुढच्या वेळी जाऊ शकेल. पण तुला करता आलं, तर एक काम कधी कर, हा रस्ता चांगला करत. तेव्हापासून माझ्या मनात हे रुतलेलं होतं की, आपण हे करायला हवे आणि म्हणून मी आज दीड लाख कोटी रुपये... आता तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा. पालखी मार्ग १२ हजार कोटी रुपयांचा आपण बांधून पूर्ण केला. तुम्ही माहूरला जा, तुम्ही तुळजापूरला जा, तुम्ही अक्कलकोटला जा, मी सर्वप्रथ धार्मिकस्थळं पूर्ण केली. यात, राम वन गमन यात्रा, हा ८ हजार कोटींचा मार्ग ५५ टक्के पूर्ण झाला. राम-जानकी मार्ग नेपाळपर्यंत नेलाय तो ४७ टक्के पूर्ण झालाय. अयोध्येच्या रिंग रोडचेकाम सुरू झाले आणि बौद्ध सर्किट म्हणून मी सिमेंटचा २२ हजार कोटीरुपयांचा मार्गही मी पूर्ण केला. अशा अनेक कामांची माहती यावेळी गडकरी यांनी दिली...

एक घटना सांगताना गडकरी म्हणाले, "एक योगायोग घडला, जगातील सर्व बौद्ध भिक्षू बोधगयेला एकत्रित आले होते. ते माझ्या मागे लागले की, तुम्ही काही करा पण याला या. मी तेथे गेलो आणि भगवान गौतम बुद्धांचे ज्या ठिकाणी देहावसान झाले, तेथे दर्शन घेतले. तेथे त्यांचा एक बोधी वृक्ष होता. ज्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं. मी आणि माझी पत्नी बरोबर होतो. वादळ अथवा हवा नव्हती. तेवढ्यात त्या बोधी वृक्षाचे एक पान खाली पडले. ते माझ्या खांद्याला लागून माझ्या पत्नीच्या अंगावर पडले. त्या ठिकाणी हाँगकाँग, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, चायना येथील बौद्ध भिक्षू होते. त्या सर्वांनी बौद्धांची प्रार्थना करून त्यांनी  मला आशिर्वाद दिला. त्यांना या प्रकल्पाचा प्रचंड आनंद झाला. आज जगातील मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मिय आज बौधगयेला येतात. यामुळे धार्मिक पर्यटन वाढले आहे." याशिवाय त्यांनी, "चार धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमनोत्री रस्ता (८२५ किलोमीटर, साडेपाच हजार कोटी.) ९०% पूर्ण झाला आहे. आता तो सुप्रीम कोर्टाच्या मॉनिटरिंग कमिटीच्या क्लिअरन्समध्ये अडकला आहे. आम्ही केदारनाथमध्ये ३६० रोपवे बांधत आहे.  हवेत चालणाऱ्या डबल डेकर बसवर काम करतोय." आदी माहितीही यावेळी गडकरी यांनी दिली.
 

Web Title: My mother had told me, Nitin, make this road good Gadkari shared his mother's wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.