शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात, ८ दिवसांत मोठा निर्णय; जयंत पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 20:19 IST

जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खल सुरू असून याबाबत आज जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jayant Patil ( Marathi News ) :  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपावर विचारमंथन सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तीन पक्षांसह आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील महाविकास आघाडीत सामील झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खल सुरू असून याबाबत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये याआधीच सविस्तर चर्चा झाली आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबतही आमच्या दोन-तीन बैठका झाल्या आहेत. पुढील आठवड्याभरात आम्ही सर्व जागांवर एकमत घडवून आणू. प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी व्यापक स्वरुपात लोकांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न राहील," असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "एकनाथ खडसे हे रावेर लोकसभेची जागा लढणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी आता निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता त्या जागेवर आम्ही खडसे यांच्याशी चर्चा करून योग्य उमदेवार देऊ," अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या

जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगत होती. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, "माझी भाजपच्या कोणत्याही नेत्यासोबत चर्चा झालेली नाही. मला भाजपकडून कसलीही ऑफर नाही. मात्र दर आठ दिवसाला माझ्याबाबत मुद्दाम अशी चर्चा घडवून आणली जाते. अशी चर्चा कोण घडवून आणतं, याचा शोध घेतला पाहिजे."

दरम्यान, मागील वर्षी सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याशी मतभेद झाले. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदार आणि नेत्यांसह महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार यांच्या बंडावेळीही जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी होतील, असं बोललं जात होतं. मात्र पाटील यांनी आपण ठामपणे शरद पवारांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनाबांधणीसाठी राज्यभर फिरत आहेत. मात्र तरीही पाटील यांच्याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चा रंगत असतात.   

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस