‘सफाई मित्र, सुरक्षा चॅलेंज’ अभियानाअंतर्गत ‘सफाई मित्रांचा’ महापालिकेकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:27 PM2021-07-31T12:27:33+5:302021-07-31T12:27:44+5:30

केंद्र सरकारच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिके कडून सफाई मित्र व जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. 

municipal corporation honors Safai Mitra under Safai Mitra Suraksha Challenge campaign | ‘सफाई मित्र, सुरक्षा चॅलेंज’ अभियानाअंतर्गत ‘सफाई मित्रांचा’ महापालिकेकडून सन्मान

‘सफाई मित्र, सुरक्षा चॅलेंज’ अभियानाअंतर्गत ‘सफाई मित्रांचा’ महापालिकेकडून सन्मान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड -केंद्र सरकारच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिके कडून सफाई मित्र व जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. 

शहरी विकास मंत्रालय भारत सरकार मार्फत १९ नोव्हेंबर २०२० पासून देशातील २४३ शहारांमध्ये सफाईमित्र सुरक्षा चैलेंज" अभियान सुरु करण्यात आले आहे.  मलनि:सारण वाहीनी, सेप्टीक टैंक व मॅनहोल मध्ये कार्यरत कामगारांना सफाईसाठी अधिकृत आणि शाश्वत यंत्रणेमध्ये समावेश करुन घेणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा आहे.  जीवित हानी टाळण्यासाठी मलनि:सारण वाहीनी, सेप्टीक टँक व मॅनहोल मध्ये मानवी वापर कमी करून यांत्रिकीकरणाच्या साफसफाईला प्रोत्साहन देण्यावर भर असणार आहे. मानवी हस्तक्षेप अटळ असल्यास सुरक्षेची साधने आणि प्रशासकीय प्रमुखाची लिखित परवानगी आवश्यक असल्याने या अभियाना द्वारे सफाई कामगारांना एक प्रकारचे सुरक्षा कवच व कायद्याचे संरक्षण मिळाले आहे.

सफाई मित्रांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्याकरीता शुक्रवारी ३० जुलै २०२१ रोजी मीरारोडच्या जीसीसी क्लब येथे सन्मान सोहळा आयोजित केला होता. महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त संभाजी पानपट्टे, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दिपक खांबित, सुरेश वाकोडे, किरण राठोड व जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत, शहरी विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत पाणी पुरवठा विभागाद्वारे सुरु करण्यात आलेल्या सफाईमित्र उद्यमीकरण आणि उन्नतीकरण प्रोत्साहन योजना, सफाईमित्र इंटर्नशिप प्रोग्रॅम, सफाईमित्र चित्रकला सप्ताह आदी उपक्रम राबवले. सफाईमित्रांना युनिफॉर्म, सुरक्षा किट आणि प्रमाणपत्र त्यासोबतच इंटर्न्स ला स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, शाळकरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा का कार्यक्रम मुख्यतः सफाईमित्र, इंटर्न्स आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं फळ आणि त्यांचं या अभियानातील सहभागाचं कौतुक आयुक्त ढोले यांनी केले. 

शहरी विकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार या कार्यक्रमामध्ये लोन मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ आणि राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी सहभागी झाले होते. पाणी पुरवठा विभाग द्वारा सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत राबविल्या गेलेल्या विविध संकल्पनांचा लेखाजोखा "अप-रायझिंग: आपला मित्र, सफाईमित्र" या पुस्तकाचे प्रकाशन आयुक्त  यांच्या हस्ते करण्यात आले. 

महानगरपालिकेद्वारे सफाईमित्र सुरक्षा चलेज २०२१ अभियानामध्ये राबविल्या गेलेल्या संकल्पनांचा गौरव गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाचे मिशन संचालक नवीन कुमार आणि महाराष्ट्र नागरी विकास अभियानाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे यांनी सुद्धा केला आहे. 

सफाईमित्र इंटर्नशिप प्रोग्राम द्वारे जनजागृती साठी  महाविद्यालयीन विद्यार्थ्याना इंटर्नशिप देऊन युवकांचा या अभियानामध्ये सक्रिय सहभाग करून घेतला जात आहे.  लॉकडाऊन आणि कोरोना परिस्थती असताना देखील पाणी पुरवठा विभागाद्वारे "सफाईमित्र ऑनलाइन टॉक सिरीज" सुरु करण्यात आली.  नागरिक, शिक्षक आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अभियान सक्रिय ठेवण्यास प्रोत्साहन देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला सप्ताह आयोजन, निबंध स्पर्धा, पथनाट्ये, पेंटिंग, ऑनलाईन फीडबॅक फॉर्म यामार्फत देखील घरोघरी नागरिकांपर्यंत 'सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज' याची जनजागृती करण्यात आली. 

केंद्र सरकारच्या सफाईमित्र सुरक्षा चैलेंज अभियान अंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत सेप्टिक टैंक, मलनि:सारण वाहीनी, मॅनहोल संबंधित तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १४४२० आणि व्हॉटसॲप क्रमांक ८६५७९०६८८० सुरु करण्यात आलेला आहे. परिसरामध्ये सेप्टिक टँक, मलनिःसारण वाहीनी, मॅनहोल साफ करताना केल्या जाणाऱ्या असुरक्षित प्रथांबाबत नागरिकांनी तक्रार नोंदणीसाठी सफाईमित्र राष्ट्रीय मदत क्रमांक १४४२० किंवा व्हॉटसॲप क्रमांक ८६५७९०६८८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त  ढोले यांनी केले आहे.
 

Web Title: municipal corporation honors Safai Mitra under Safai Mitra Suraksha Challenge campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app