मुंडे यांची साथ होती, म्हणून खासदार झालो : श्रीरंग बारणे
By Admin | Updated: June 3, 2014 22:11 IST2014-06-03T20:19:34+5:302014-06-03T22:11:57+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ मिळाली, म्हणूनच खासदार होऊ शकलो, अशा भावना मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केल्या.

मुंडे यांची साथ होती, म्हणून खासदार झालो : श्रीरंग बारणे
पिंपरी : भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ मिळाली, म्हणूनच खासदार होऊ शकलो, अशा भावना मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केल्या.
मावळ लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी मला शिवसेनेची उमेदवारी मिळावी, म्हणून ते स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले. उमेदवारी निित झाल्याचेसुद्धा त्यांनीच मोबाइलवरून कळविले होते. १९९९ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक लढवली. काँग्रेसच्या उमेदवारीवर नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. कायदेशीर पेच निर्माण झाल्याने महापालिका सभेत ही निवड होणार असल्याने अन्य सदस्यांची मदत लागणार होती. त्या वेळी काँग्रेसचे नेते स्वर्गीय प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याशी संवाद साधून मुंडे यांनी महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा मला पाठिंबा मिळवून दिला होता. कार्यकर्त्यांना खंबीर साथ देणारा नेता हरपल्याने राजकारण, समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पिंपरीतील हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्स कंपनीच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी कामगार नेते अनंत कुमार यांच्याशी भेट घडवून आणण्याबाबत मी सोमवारी २ जूनला त्यांच्याशी संपर्क साधला होता. लवकरच याबाबत कळवतो, असे त्यांनी आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी त्यांचा काही काळ सहवास लाभला. हे सर्व माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.