शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

मुंबापुरी महागडीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 02:13 IST

देशाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा आता महागड्या शहरांतही समावेश झाला

मुंबई : देशाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा आता महागड्या शहरांतही समावेश झाला आहे. जगातील सर्वांत महागड्या शहरांच्या यादीत मुंबईचा २१ वा क्रमांक लागला आहे. नाइट फ्रँक वेल्थ अहवालानुसार मुंबईने टोरंटो, वॉशिंग्टन डीसी आणि मॉस्कोसारख्या शहरांना मागे टाकले आहे.नाइट फ्रँक वेल्थ अहवालानुसार, दिल्लीने बँकॉक, सिएटल, जकार्ता या शहरांवर मात केली आहे. दिल्लीने ३५ वा क्रमांक पटकावला आहे. जागतिक सर्वाधिक श्रीमंत लोकसंख्या असलेल्या ८९ देशांतील १२५ शहरांचा अभ्यास सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार मागील दशकभरात भारतात २९० टक्क्यांनी अतिश्रीमंतांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, भविष्यातील संपत्तीधारकांच्या यादीत मुंबईचा अकरावा क्रमांक आहे. या यादीतही मुंबईने शिकागो, सिडनी, पॅरिस, सेऊल, दुबई या शहरांना मागे टाकले आहे. सर्वांत महागड्या मुख्य निवासी (प्राइम रेसिडेन्शियल) शहरांमध्ये मुंबई पंधराव्या स्थानी आहे. महागड्या शहरांच्या यादीत समावेश झाल्याने मुंबईचा भाव आणखीच वधारला आहे. (प्रतिनिधी)>जगभरातील देशांचे सर्व्हेक्षणनाइट फ्रँक वेल्थ अहवालासाठी जगातील ८९ देशांतील १२५ शहरांचा अभ्यास करण्यात आला. २०० कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या लोकांची नोंद अहवालात आहे. देशातील सर्वाधिक १ हजार ३४० श्रीमंत मुंबई शहरात आहेत. दिल्लीत ६८०, कोलकात्यात २८० आणि हैदराबाद येथे २६० श्रीमंतांची नोंद झाली आहे. जगातील सर्वांत महागड्या शहरांच्या यादीत मुंबई २१ व्या स्थानी आहे. देशातील अतिश्रीमंतांचा घर घेण्याचा कल सिंगापूर, यूके, यूएई आणि हाँगकाँगकडे आहे. २०१५ पासून पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबईमध्ये श्रीमंतांची संख्या वाढते आहे.>न्यू वर्ल्ड वेल्थ अहवाल काय म्हणतो?मुंबईमध्ये ४६ हजार कोट्यधीश आणि २८ अब्जाधीश राहतात. मुंबईची एकूण मालमत्ता ८२० अब्ज डॉलर आहे. मुंबई देशातील सर्वांत श्रीमंत शहर आहे.दुसऱ्या स्थानी दिल्ली, तिसऱ्या स्थानी बंगळुरू आहे. दिल्लीत कोट्यधीशांची संख्या २३ हजार असून, अब्जाधीश १८ आहेत. दिल्लीची एकूण मालमत्ता ४५० अब्ज डॉलर आहे. बंगळुरूची एकूण मालमत्ता ३२० अब्ज डॉलर आहे. बंगळुरूत ७ हजार ७०० कोट्यधीश आणि ८ अब्जाधीश राहतात.हैदराबादची एकूण मालमत्ता ३१० अब्ज डॉलर आहे. हैदराबादमध्ये ९ हजार कोट्यधीश आणि ६ अब्जाधीश आहेत. कोलकात्यामध्ये कोट्यधीशांची संख्या ९ हजार ६०० असून, ४ अब्जाधीश आहेत. कोलकाता शहराची एकूण मालमत्ता २९० अब्ज डॉलर आहे. पुण्याची एकूण मालमत्ता १८० अब्ज डॉलर आहे. पुण्यात ४ हजार ५०० कोट्यधीश आणि ५ अब्जाधीश राहतात.देशाची एकूण मालमत्ता ६ हजार २०० अब्ज डॉलर आहे. देशात २ लाख ६४ हजार कोट्यधीश आणि ९५ अब्जाधीश आहेत. दरम्यान, या यादीत चेन्नई, चंदिगढ, सुरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गोवा, जयपूर, वडोदरा या शहरांचा समावेश आहे.