Mumbai's minimum temperature settled at 18 degrees | मुंबईचे किमान तापमान १८ अंशांवर स्थिर
मुंबईचे किमान तापमान १८ अंशांवर स्थिर

मुंबई : रविवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबई वगळता राज्यात कमालीचा गारठा जाणवत असून, मुंबईत आता कुठे किंचित थंडी अनुभवास येत आहे.


गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे.


विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. १६ ते १९ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. सोमवारसह मंगळवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात चांगलीच घट नोंदविण्यात येत आहे. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले असतानाच शनिवारी यात आणखी घट झाली आहे. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले असून, रविवारीही मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले.

शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
पुणे १५.२
जळगाव १५.६
महाबळेश्वर १४.४
मालेगाव १५.५
नाशिक १४
सातारा १५.८
उस्मानाबाद १३.८
औरंगाबाद १६.३
नांदेड १६
नागपूर १६.८
वाशिम १५.८
यवतमाळ १६.४

Web Title: Mumbai's minimum temperature settled at 18 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.