मुंबई : घरात घुसून महिला डॉक्टरचा विनयभंग करणा-याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 21:49 IST2017-10-01T21:49:37+5:302017-10-01T21:49:57+5:30
एका घरात घुसून महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याची घटना दक्षिण मुंबईतील एल.टी.मार्ग परिसरात घडली आहे.

मुंबई : घरात घुसून महिला डॉक्टरचा विनयभंग करणा-याला अटक
मुंबई : एका घरात घुसून महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याची घटना दक्षिण मुंबईतील एल.टी.मार्ग परिसरात घडली आहे. छेडछाड करणा-या नेत्रबहाद्दूर थापा (वय२२) पोलिसांनी अटक केली आहे.
दक्षिण मुंबईतील २६ वर्षाची डॉक्टर तरुणी घरात एकटी असताना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुुमारास थापा घरात शिरला. तिच्याशी अश्लील वर्तन करु लागला. तिच्या आरड्याओरड्याने त्याने पलायन केले. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नेत्रबहाद्दूर थापाला अटक केली.