शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

मुंबई-ठाण्यातील ग्रंथालयांचे सोमवारपासून ‘पुनश्च हरीओम’; शासनाचे परिपत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 2:50 AM

ग्रंथालयीन कर्मचारी आणि वाचकांतून स्वागत; सात महिन्यांत विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसणार

स्वप्निल कुलकर्णी मुंबई : कोरोनामुळे सात महिने सार्वजनिक वाचनालये बंद होती. त्यामुळे सार्वजनिक ग्रंथालये सुरू करण्याची मागणी कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, वाचनप्रेमींकडून होत होती. राज्य सरकारने बुधवारी त्यासंबंधी परिपत्रक काढून वाचन प्रेरणा दिनापासून ग्रंथालये सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु वाचकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेऊन योग्य उपाययोजना कराव्या लागणार असल्याने मुंबई आणि उपनगरातील बहुतेक सार्वजनिक वाचनालये सोमवारपासून सुरू होतील असे चित्र आहे.

सध्या मुंबई शहरात २९, उपनगरांत ४५ तर ठाणे आणि पालघरमध्ये १४३ सार्वजनिक ग्रंथालये आहेत. पुस्तके देवाणघेवाणीतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो या भीतीपोटी सात महिने सार्वजनिक ग्रंथालये बंद ठेवण्यात आली होती. पुस्तकांची दुकाने काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती, तरी सार्वजनिक ग्रंथालयांना परवानगी देण्यात आली नव्हती. मंजूर झालेले अनुदानही ग्रंथालयांना अद्याप मिळाले नाही. त्यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी परत कशी बसवायची, असा प्रश्न ग्रंथालय व्यवस्थापनांसमोर होता. मात्र आता शासनाने वाचन प्रेरणा दिवसाचा मुहूर्त साधत सार्वजनिक वाचनालयाची कवाडे पुन्हा खुली करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे ग्रंथालयीन कर्मचारी, वाचक तसेच विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.ग्रंथालये ही आधुनिक तीर्थक्षेत्रे आहेत. ती गुरुवारपासून खुली झाली याचा मनस्वी आनंद आहेच. आम्ही शासनाने दिलेले सर्व नियम व अटी यांचे पालन करू. - विनायक गोखले, अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ

वाचकांप्रमाणेच कर्मचारीदेखील ग्रंथालयात येण्यास उत्सुक आहेत. शासनाने दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यासाठी थोडा वेळ घेत आहोत. सोमवारपासून ग्रंथालये नक्की सुरू होतील. - सुनील कुबल, अधीक्षक, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ग्रंथालये कधी सुरू होत आहेत याचीच वाट पाहत होतो. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणारच आहोत. पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे. परंतु सर्व तयारीसह सोमवारपासून वाचकांना सेवा देण्यासाठी आम्ही तयार असू. - संदीप पेडणेकर, ग्रंथपाल, माहीम सार्वजनिक वाचनालय

टॅग्स :libraryवाचनालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार