शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

रूळ पाण्याखाली, रेल्वे कोलमडली; अनेक गाड्या रद्द, अनेकांचे मार्ग बदलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 3:45 PM

मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पावसानं अनेक रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांवर लोकांच्या कमरेपर्यंत पाणी आलं आहे.

मुंबईः मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पावसानं अनेक रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांवर लोकांच्या कमरेपर्यंत पाणी आलं आहे. त्यामुळे कधीही न थांबणा-या मुंबईची गतीही काहीशी मंदावली आहे. रस्त्यांपासून रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत.अशातच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरच्या ब-याचशा लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींच्या मार्गात बदल केले गेले आहेत. 22106 पुणे- मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर 11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस रद्द केली आहे. 22105 मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसही रद्द केली आहे. तर उद्या धावणारी 11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच आज आणि उद्या धावणारी 51317/51318 पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 11026 पुणे-भुसावळ या ट्रेनच्या मार्गात बदल करून ती दौंड-मनमाडमार्गे वळवली आहे.तर 11025/11026 भुसावळ-पुणे-भुसावळ ट्रेनही मनमाड-दौंड मार्गे वळवण्यात आली आहे. पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस ही दौंड-मनमाड-खांडवा- भोपाळ मार्गे वळवली आहे. तुतिकोरीन-ओखा विवेक एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करून ती इगतपुरी-मनमाड-जळगावमार्गे वळवली आहे. यशवंतपूर-बारमेर वातानुकूलित एक्स्प्रेसही इगतपुरी-भुसावळ- खांडवा- भोपाळ- रतलाम- बेराच मार्गे धावणार आहे. रेल्वे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Mumbai Train Updateमुंबई ट्रेन अपडेटpassengerप्रवासीcentral railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट