मुंबईतीलगोरेगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पार्क केलेल्या एका व्हॅनमध्ये नवजात बाळ आढळून आले. पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेऊन ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.
आज मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास बीट मार्शल परिसरात गस्त घालत असताना, त्यांना रस्त्यावरील एका व्हॅनमधून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. पोलिसांनी त्वरीत आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता त्यांना कपड्यात गुंडाळलेले नवजात बाळ आढळून आले. कोणताही वेळ न दवडता, बांगुर नगर पोलिसांनी निर्भया पथकाच्या मदतीने नवजात बाळाला तातडीने वैद्यकीय सेवेसाठी शताब्दी रुग्णालयात नेले.डॉक्टरांनी बाळावर तात्काळ उपचार केले आणि बाळ सुरक्षित तसेच स्थिर असल्याचे स्पष्ट केले. आवश्यक वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर बाळाला डिस्चार्ज देण्यात आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी निर्भया पथकाच्या मदतीने या बाळाला पुढील काळजी घेण्यासाठी अंधेरी पश्चिम येथील सेंट कॅथरीन होम या बालसंगोपन संस्थेकडे सोपवले.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तसेच या गुन्ह्यातील आरोपींना शोधून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशीही मागणी केली.
Web Summary : A newborn was found abandoned in a van in Goregaon, Mumbai. Police rescued the baby and admitted it to a hospital. An investigation is underway to find the culprits.
Web Summary : मुंबई के गोरेगांव में एक वैन में एक नवजात शिशु मिला। पुलिस ने बच्चे को बचाया और अस्पताल में भर्ती कराया। दोषियों को खोजने के लिए जांच जारी है।