शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना मिळाला व्हाट्सअ‍ॅप मेसेज; उडाली खळबळ, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 19:01 IST

यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "ज्या नंबरवरून हा मेसेज आला, त्याचा तपास आम्ही केला आहे. हा क्रमांक अजमेर राजस्थानचा असल्याचे आम्हाला समजले आहे. संशयिताला पकडण्यासाठी आमचे एक पथक तत्काळ राजस्थानला रवाना झाले आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी असणारा एक मेसेज शनिवारी मुंबई पोलिसांना मिळाला. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर आलेल्या या मेसेजमध्ये, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे (आयएसआय) दोन एजंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बने घडवण्याचा कट आखत असल्याचे, लिहिण्यात आले होते. हा मेसेज मिळताच मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. 

यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "ज्या नंबरवरून हा मेसेज आला, त्याचा तपास आम्ही केला आहे. हा क्रमांक अजमेर राजस्थानचा असल्याचे आम्हाला समजले आहे. संशयिताला पकडण्यासाठी आमचे एक पथक तत्काळ राजस्थानला रवाना झाले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या वाहतूक नियंत्रण पथकाच्या हेल्पलाइनवर हा धमकीचा मेसेज पहाटेच्या सुमारास मिळाला. या मेसेजमध्ये आयएसआयच्या दोन एजंटांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटासंदर्भात सांगण्यात आले आहे. या मेसेजनुसार, दोन एजंट पीएम मोदींना बॉम्बने उडवण्याचा कट आखत आहेत. संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे की,  धमकी देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अथवा दारूच्या नशेत असावी, असा संशय तपासकर्त्यांना आहे. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. तथापि, संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे,  यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर असे धमकीचे कॉल आणि मेसेज आले आहेत.

सलमान खानसंदर्भातही आले आहेत धमकीचे मेसेज -मुंबई पोलिसांना गेल्या दहा दिवसांत अभिनेता सलमान खानला मारण्याचेही 2 मेसेज आले आहेत. नुकताच काल एक मेसेज आला होता, ज्यामध्ये सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी आणि तेथे समाजासाठी 5 कोटी रुपये दान करावेत, असे म्हटले होते. जर त्याने असे केले नाही तर आम्ही त्याला लवकरच संपवू. विष्णोई गँग अजूनही अॅक्टिव्ह आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMumbai policeमुंबई पोलीसPoliceपोलिसBJPभाजपाRajasthanराजस्थान