शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुंबई देशातील सर्वात महागडे शहर; दिल्लीलाही टाकले मागे, चेन्नई तिसऱ्या, बंगळुरू चौथ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:35 IST

‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’, अर्थात राहणीमानाचा खर्च आणि यास पूरक मुद्यांच्या अनुषंगाने एका आंतरराष्ट्रीय कंपनीने आशिया खंडातील काही प्रमुख देश आणि त्यातील प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण केले.

मुंबई : जीवनशैली, राहणीमान, दैनंदिन खर्च, जागांचे भाव अशा विविध मुद्यांच्या आधारे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर देशातले सर्वात महागडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, महागड्या शहरांच्या यादीत मुंबई शहराने देशाची राजधानी दिल्लीलाही मागे टाकले आहे. दिल्ली दुसऱ्या, तर चेन्नई तिसऱ्या, बंगळुरू चौथ्या आणि हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आहे. 

‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’, अर्थात राहणीमानाचा खर्च आणि यास पूरक मुद्यांच्या अनुषंगाने एका आंतरराष्ट्रीय कंपनीने आशिया खंडातील काही प्रमुख देश आणि त्यातील प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण केले. दरवर्षी होणाऱ्या या सर्वेक्षणात घरगुती वापराच्या वस्तू, अन्नधान्याच्या किमती, घरांच्या किमती, वाहतुकीचा खर्च, खाद्यान्नाच्या किमती, कपडे, मनोरंजनावर होणारा खर्च आदी महत्त्वपूर्ण घटक विचारात घेतले जातात. शहरनिहाय या घटकांच्या किमती, तेथील नागरिकांचे उत्पन्न आणि या घटकांवर होणारा खर्च याचे समीकरण मांडले जाते आणि त्यानुसार शहरांची क्रमवारी जाहीर केली जाते. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे विद्यार्थ्यांपासून प्रत्येक घरातील जवळपास सर्वच सदस्यांचे काम हे ऑनलाइन पद्धतीने झाले. त्यामुळे यंदाच्या सर्वेक्षणामध्ये मोबाइल, टॅब्लेट, कॉम्प्युटर या घटकांच्या किमतीदेखील विचारात घेण्यात आल्या आहेत.

मुंबईनंतर पुणे महागडे -देशात मुंबई हे सर्वात महागडे शहर जरी असले, तरी महाराष्ट्रात मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर आहे. पुण्यातील जागांच्या किमती तसेच राहणीमान हे दोन्ही राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत महागडे असल्याचे दिसून आले आहे. 

...तरीही मुंबईलाच पसंती-    सर्वेक्षणानुसार आशिया खंडात सर्वात महागडे राहणीमान आणि जीवनशैली ही हाँगकाँगची असून, त्यापाठोपाठ सिंगापूर, बिजिंग यांचा समावेश आहे.-    परंतु मुंबई येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे आणि त्या देशांच्या / शहरांच्या तुलनेत मुंबई स्वस्त असल्याने कंपनीचे कार्यालय सुरू करताना इतर देशांच्या तुलनेत बहुराष्ट्रीय कंपन्या पहिली पसंती मुंबईलाच देत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई का महाग?अन्नधान्य, औषधी, कपडे, जागा अशा सर्वच घटकांच्या किमती या देशातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आहेत. या किमती देशातील अन्य मेट्रो शहरांच्या तुलनेत किमान २० टक्के ते कमाल ४० टक्के अधिक आहेत. त्यामुळेच महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने पहिला क्रमांक गाठला आहे.  

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली