मुंबईच्या नगरसेवकांना आता महिन्याला मिळणार 25 हजार
By Admin | Updated: July 15, 2017 20:54 IST2017-07-15T20:54:34+5:302017-07-15T20:54:34+5:30
एकूण 27 महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनात अडीचपट वाढ झाली आहे.

मुंबईच्या नगरसेवकांना आता महिन्याला मिळणार 25 हजार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - एकूण 27 महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनात अडीचपट वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना आता महिन्याला मानधनापोटी 10 हजारांऐवजी 25 हजार रुपये मिळणार आहेत. अ वर्गात मोडणा-या महापालिकेतील नगरसेवकांना महिन्याला मानधनापोटी 20 हजार रुपये मिळतील.
आणखी वाचा
ब वर्गात मोडणा-या महापालिकांच्या नगरसेवकांचे मानधन 7500 वरुन 15 हजार रुपये करण्यात आले आहे. क व ड वर्गातील महापालिकेतील नगरसेवकांना 7500 ऐवजी महिन्यात 10 हजार रुपयांचे मानधन मिळेल.