शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

एमएसआरडीसीचे सगळेच प्रकल्प डब्यात!

By admin | Updated: May 15, 2015 01:57 IST

एमएसआरडीसीचे सगळेच प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले गेले. कधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तालावर त्यांना नाचवले गेले तर कधी पायाभूत सुविधा

अतुल कुलकर्णी, मुंबईएमएसआरडीसीचे सगळेच प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले गेले. कधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तालावर त्यांना नाचवले गेले तर कधी पायाभूत सुविधा समितीच्या बैठका न घेता प्रकल्प रखडवले गेले. परिणामी या सगळ्या प्रकल्पांच्या किमती हजारो कोटींनी वाढल्या आणि आता हे सगळेच प्रकल्प जवळपास डब्ब्यात गेल्याचे जमा आहेत.प्रलंबित प्रकल्पांची यादी जरी पाहिली तरी वास्तव समोर येईल. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरती ८ कि.मी. लांबीचा टनेल आणि ४ किमी लांबीचे आठपदरीकरण हे काम ११ जुलै २०१२ पासून रखडलेले आहे. याला ७००० कोटींचा खर्च येणार होता.वरळी हाजीअली सागरी सेतूच्या दोन मार्गिकेच्या दोन कामांना ७२०० कोटींचा खर्च अपेक्षीत होता हे काम १६ आॅगस्ट २०१२ पासून पडून आहे. ठाणे घोडबंदर रोडवर चार किमी लांबीचा उड्डाण पूल करण्याचे काम २० डिसेंबर २०१३ पासून पडून आहे ज्यासाठी ४७८ कोटींचा खर्च अपेक्षीत होता. ठाणे क्रीक ब्रिज ३ चे काम १३ सप्टेंबर पासून पडून आहे ज्यासाठी १३ सप्टेंबर २०१३ पासून पडून आहे ज्यासाठी ६६० कोटींचा खर्च येणार होता.इस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट ची प्रवासी जलवाहतूक करण्याचे काम मे २०१४ पासून ठप्प झाले ज्यावर ९१५ कोटी खर्च येणार आहे. पुणे रिंगरोडच्या आजूबाजूला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी जागा घेऊन ठेवल्या होत्या. १७० किमी लांबीचा हा रस्ता होता ज्यासाठी ७५६० कोटी खर्च येणार होता हे काम ५ सप्टेंबर २०१२ पासून ठप्प झाले आहे.पेडर रोडचा ३५९५ मिटर लांबीचा दुहेरी उड्डाणपूलाला मे २०१४ मध्ये ३०१ कोटी खर्च येणार होता. तर नागपूर-औरंगाबाद-मुंबई कॉरीडोअरचे चौपदरीकरण व वर्धा घोटी औरंगाबादचे काम २०१३ पासून पडून आहे ज्यावर १७३५ कोटी रुपये खर्च येणार होता. वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचे काम निविदा प्रक्रीयेत अडकले ज्यावर ४६९६ कोटी खर्च अपेक्षीत होता. तर एन एच ४ आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर काही भागात चौपदरीकरण करण्याचे काम आॅगस्ट २०१४ पासून प्रलंबित आहे ज्यावर ४८५ कोटी खर्च येणार आहे.एमएसआरडीसीचा पांढरा हत्ती कसा झाला हे वरील कामांची यादी पाहीली तरी सहज लक्षात येईल. मात्र हा विभाग बंद तरी करावा किंवा यावर गंभीरपणे काही निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती एकाही नेत्यामध्ये नाही.