शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

MPSC Results: राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 7:46 PM

MPSC Results: साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे.

पुणे: सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी)आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे. रोहन कुवर यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून तर मानसी पाटील यांनी मुलींमधून प्रथम कमांक पटकावला आहे.

एसईबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. आरक्षणाबाबत निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यापूर्वी घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करू नये. तसेच नवीन पदांसाठी भरती करू नये,अशी भूमिका विविध स्तरावरून मांडण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने भरती प्रक्रियेबाबत अध्यादेश प्रसिध्द केला. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदे खुल्या पदांमध्ये रुपांतरित करण्यात आली. त्यानुसार 420 पदांचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा 2019 चा अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी ‘ऑप्टिंग आऊट ’मागवले होते. त्यामुळे काही उमेदवारांनी स्वत:हून आपला समावेश या निकालात करू नये, असे आयोगाला कळवले होते.परिणामी सुधारित निकालामुळे कोणतीही नियुक्ती न मिळता बाहेर फेकल्या जाणा-या अनेक उमेदवारांचा फायदा झाला आहे. मात्र,पूर्वीच्या निकालात समावेश असणा-या काही उमेदवारांना सुधारित निकालाचा फटका बसला आहे.परंतु,या उमेदवारांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असल्याचे सुधारित निकालात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून सांगितले जात आहे.ऑप्टिंग आऊट म्हणजे काय ? राज्यसेवा 2019 च्या अंतिम निकालातून मिळणारे पद ज्या उमेदवारांना नको आहे, अशा उमेदवारांनी आपली नावे आयोगाला कळवावीत,असे आवाहन केले होते. त्यानुसार काही उमेदवरांनी आयोगाच्या आव्हाना प्रतिसाद दिला. परिणामी आरक्षण बदलामुळे बाहेर फेकल्या जाणा-या उमेदवरांना या पदांवर नियुक्ती देणे शक्य झाले.काही उमेदवार सध्या शासकीय सेवेत असून त्यांना पदोन्नती मिळाली आहे. राज्यसेवा 2019 च्या अंतिम निकालतून त्यांना कनिष्ठ स्तरावरील पद मिळाले असले.त्यामुळे आॅप्टिंग आऊटचा अनेकांना फायदा झाला.

राज्य शासनाच्या चालढकल धोरणामुळे सुमारे एक वर्ष उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही.त्यामुळे शासनाने अधिक विलंब न करता पुढील 15 दिवसात नियुक्तीपद द्यावे.- महेश पांढरे, उत्तीर्ण उमेदवार

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा