CoronaVirus News: उद्याची एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 02:47 IST2021-04-10T02:47:10+5:302021-04-10T02:47:35+5:30
परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच परीक्षा फॉर्म भरतानाचे विद्यार्थ्यांचे वय गृहीत धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

CoronaVirus News: उद्याची एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससीमार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच परीक्षा फॉर्म भरतानाचे विद्यार्थ्यांचे वय गृहीत धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
स्वागतही अन् विरोधही...
एकीकडे अनेक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलल्याने सरकारचे आभार मानत असताना दुसरीकडे अवघ्या २ दिवसांवर परीक्षा असताना सरकारने ती रद्द केल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबई, पुणे केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी नाराज आहेत. परीक्षेसाठी पुन्हा यावे लागेल. परीक्षा झाली असती तर सुटलो असतो, असे मत त्यांनी मांडले.