MPSC Exam Postponed : 'मुख्यमंत्री, आता तरी कणा दाखवा, एमपीएससीच्या परीक्षा घ्या!' - प्रकाश आंबेडकर
By Atul.jaiswal | Updated: March 11, 2021 18:13 IST2021-03-11T17:56:13+5:302021-03-11T18:13:43+5:30
Prakash Ambedkar Oppose Thackeray Government Decision मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घेतल्या पाहिजे, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे.

MPSC Exam Postponed : 'मुख्यमंत्री, आता तरी कणा दाखवा, एमपीएससीच्या परीक्षा घ्या!' - प्रकाश आंबेडकर
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचे सांगत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा घेतल्या पाहिजे, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. (Prakash Ambedkar On MPSC Exam Decision)
राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. याबाबत त्यांनी कोरोना वाढत असल्याचे कारण दिले आहे. परंतु हा निर्णय म्हणजे ओबीसी, एससी व एसटी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. राज्य शासन श्रीमंत मराठा याला बळी पडत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवला पाहिजे व परीक्षा घेतल्या पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.