शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तुम्ही आधी ठरवा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 09:55 IST

भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केले म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली होती.

Supriya Sule Replied To Amit Shah : पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शाह यांनी केली. अमित शाह यांनी केलेल्या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं.

पुण्यात भाजपच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं अमित शाह म्हणाले होते. यावरुन आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता असं म्हटलं.

शरद पवार सत्तेवर आले की मराठा आरक्षण जाते - अमित शाह

"जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जाते. २०१४ ला भाजपा सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले तेव्हा मराठा आरक्षण गेलं. त्यामुळे आता तुम्ही ठरवा काय करायचं ते," असेही अमित शाह म्हणाले.

सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर "आज भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात, ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं. याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं. अमित शाह हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, हे सर्व ते विसरले असतील, त्यामुळे त्यांनी टीका केली,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. अमित शाहांच्या कार्यक्रमात ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप होते ते अशोक चव्हाण यांच्या मागे बसले होते, महाराष्ट्रच नाही, तर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारपर्यंत ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले. ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यापैकी ९० टक्के लोक आज भाजपमध्ये आहेत ते वॉशिंग मशीनमुळे," असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेAmit Shahअमित शाहAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा