शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:16 IST

MP Sunetra Ajit Pawar News: अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अन् आपणही आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करावी आणि, अशी इच्छा आहे का? असा प्रश्न खासदार सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला होता.

MP Sunetra Ajit Pawar News: देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीला शेवटची शासकीय पूजा केली होती ती २०१९ मध्ये. आता पाच वर्षांनंतर येत्या ६ जुलै रोजी पहाटे मुख्यमंत्री म्हणून ते सपत्नीक ही महापूजा करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजेसाठी सपत्नीक यावे, असे निमंत्रण मंदिर समितीतर्फे फडणवीस यांना वर्षा शासकीय निवासस्थानी देण्यात आले. यातच जोरदार पाऊस झाल्याने अभूतपूर्व उत्साहात संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी सुरू झाला. या सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याबाबत पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला. 

अजित पवार आतापर्यंत अनेकवेळे उपमुख्यंत्रिपदी बसलेले आहेत. मात्र त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मात्र अद्याप मिळालेली नाही. यावरून अजित पवार गटातील नेते, अजित पवार यांचे समर्थक अनेकदा भाष्य करत असतात. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत कार्यकर्ते इच्छा व्यक्त करत असतात. एका कार्यक्रमात बोलताना खुद्द अजित पवार यांनीही यावर भाष्य केले होते. मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटते की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण कुठे जमते, असे अजित पवार म्हणाले होते. आता खासदार सुनेत्रा पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 

पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील

तुम्हीदेखील पांडुरंगाची पूजा लवकरच करावी आणि अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न खासदार सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, आपण नेमही चांगल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत असतो. पण शेवटी काय द्यायचे आणि काय द्यायचे नाही हे देवाच्या हातात असते. तेव्हा पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील, असे सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केले. 

दरम्यान, आषाढीवारीसाठी मंगळवारी सांयकाळीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडेकरी, दिंड्या, फडकरी, वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. त्यामुळे इंद्रायणी हरीभजन आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाली होती.  इंद्रायणीतीरी टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती, वरूणराजाचा अभिषेक होऊनी,  तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती. अशी अपूर्व अनुभूती देहूनगरीत येत आहे. आषाढी वारीमुळे  वारकरी वर्गात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण होते.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारChief Ministerमुख्यमंत्री