शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच"; संजय राऊतांनी पोस्ट केला वाल्मीक कराडचा खळबळजनक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 07:44 IST

खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचा एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

Beed Sarpanch Murder Case: बीडच्या  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून काही अद्याप फरार आहेत. अशातच या प्रकणात संशयित आरोपी म्हणून वाल्मीक कराडला देखील अटक करण्यात आली आहे. बीडमधील खासदार आणि आमदारांनी वाल्मीक कराडच्या दहशतीची अनेक उदाहरणे याआधी दिली होती. वाल्मीक कराडचा थेट मंत्री धनंजय मुंडे याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वाल्मीक कराडचा एक फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सगळ्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे या सगळ्यामागचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड असल्याचा आरोप देखील केला जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अशातच आता एक फोटो शेअर करून संजय राऊत यांनी मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत असल्याचे म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दिसून येत आहेत. "एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या  हत्येचा  तपास खरच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत, सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता," असं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची मागणी धस यांनी केली आहे. मात्र विनाकारण आपला राजीनामा मागितला जात असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तर धनंजय मुंडेंविरोधात चौकशीत जोपर्यंत पुरावे मिळणार नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSanjay Rautसंजय राऊतwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडे