शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

हनुमान चालिसेवरून रान उठवणाऱ्या नवनीत राणा फसल्या, हनुमानासंदर्भात प्रश्न विचारताच गडबडल्या; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:35 AM

या व्हिडिओत राणा दांपत्य एका वृत्त वाहिणीला मुलाखत देताना दिसत आहे. यावेळी अँकरने हनुमानासंदर्भात नवनीत राणा यांना विचारलेल्या एका प्रश्नावर हे दांपत्य गडबडल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रात हनुमान चालीसेवरून जबरदस्त राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रावरील संकट दूर व्हावे यासाठी आपण मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार, असे म्हणत नवनीत राणा आणि रवी राणा या दांपत्याने जबरदस्त राण उठवले होते. यासाठी राणा दांपत्य मुंबईतही पोहोचले. पण शिवसैनिकांच्या प्रचंड विरोधामुळे त्यांना मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणता आली नाही. यावेळी, पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. यानंतर हे दांपत्य 14 दिवस तुरुंगातही होते. 

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणा दांपत्य थेट दिल्लीला पोहोचले आणि तेथे त्यांनी हनुमान चालीसा पठण केले. या घटनेनंतर राणा दांपत्य चांगलेच चर्चेत आहे. आता राणा दांपत्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राणा दांपत्य एका वृत्त वाहिणीला मुलाखत देताना दिसत आहे. यावेळी अँकरने हनुमानासंदर्भात नवनीत राणा यांना विचारलेल्या एका प्रश्नावर हे दांपत्य गडबडल्याचे दिसून आले. 

राणा दांपत्याने टाइम्स नाऊ नवभारतला दिलेल्या या मुलाखतीवेळी अँकरणे नवनीत राणा यांना विचारले, की आपण हनुमानाच्या एवढ्या भक्त आहात, तर मला सांगा की, हनुमानाचे नाव हनुमान कसे पडले? हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर नवनीत राणा एकदम गडबडल्याचे दिसून आले. यावेळी नवनीत यांच्या जवळ असलेले रवी राणाही शांत बसले होते. यावर नवनीत राणा यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही. यानंतर, अँकरणे त्यांना पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारला. यावर,  "आपण इतिहासात घेऊन जात असाल, तर इतिहासही पुन्हा वाचला जाईल. पण, मी हनुमान चालीसा वाचते, यासंदर्भात मी नक्की बोलू शकते," असे उत्तर नवनीत राणा यांनी दिले. हा व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

लोकसभा अध्यक्षांची घेतली होती भेट - हनुमान चालिसा प्रकरणानंतर राणा दांपत्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली होती. यावेळी, अटकेपासून ते सुटकेपर्यंत आणि रुग्णालायापासून ते घरी पोहोचेपर्यंतचा संपूर्ण घडामोडींची माहिती आपण लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. याच बरोबर, माझ्या तक्रारीची दखल घेत, मला संपूर्ण बाजू मांडण्यासाठी 23 तारीख देण्यात आली आहे, असेही राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. 

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाinterviewमुलाखत