अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रवी राणा, नवनीत कौर राणा बुलेटवरून विनामास्क सुस्साट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:00 PM2021-02-20T12:00:27+5:302021-02-20T12:04:06+5:30

mp navneet rana and her husband mla ravi rana without helmet: राणा दाम्पत्याकडून नियम धाब्यावर; अद्याप कारवाई नाही

mp navneet rana and her husband mla ravi rana riding a bullet without wearing a mask and helmet | अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रवी राणा, नवनीत कौर राणा बुलेटवरून विनामास्क सुस्साट

अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रवी राणा, नवनीत कौर राणा बुलेटवरून विनामास्क सुस्साट

Next

अमरावती: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ६,११२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. जवळपास तीन महिन्यांमध्ये प्रथमच राज्यात एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून आले. अमरावती, यवतमाळ, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र लोकप्रतिनिधींना याचं किती गांभीर्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (mp navneet rana and her husband mla ravi rana riding a bullet without wearing a mask and helmet)

सार्वजनिक कार्यक्रमाला महापौर जाणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

अमरावतीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगानं वाढत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं, मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत.

१० रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील, चार प्रभाग समित्यांमध्ये अधिक संक्रमण

रवी राणा आणि नवनीत कौर राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात राणा दाम्पत्य कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे. दुचाकीवरून फिरणाऱ्या राणा दाम्पत्याच्या तोंडावर मास्क नाही. इतकंच काय त्यांनी हेल्मेटदेखील घातलेलं नाही. अमरावतीच्या रस्त्यांवर विनामास्क, विनाहेल्मेट रपेट मारणाऱ्या राणा दाम्पत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राणा दाम्पत्य सर्व नियम मोडून अमरावतीत फिरत असल्यानं कायदे हे केवळ सर्वसामान्यांसाठी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अद्याप तरी राणा दाम्पत्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून राणा दाम्पत्याला नियम, कायद्यांमधून सूट देण्यात आली आहे का, असा सवाल सामान्यांना पडला आहे.

Web Title: mp navneet rana and her husband mla ravi rana riding a bullet without wearing a mask and helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.