शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मातृदिन विशेष : आई होऊन काळजी घेणाऱ्या ‘आया' दुर्लक्षित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 7:00 AM

बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या संगोपनासाठी आई तयार होईपर्यंत रुग्णालयातल्या ‘आया’ बाळाची काळजी घेतात.

अतुल चिंचली/प्रिती जाधव पुणे : घरगुती बाळंतपण होण्याचे दिवस केव्हाच संपले. आता बहुतांश बाळांचा जन्म रुग्णालयांमध्येच होतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या संगोपनासाठी आई तयार होईपर्यंत रुग्णालयातल्या ‘आया’ बाळाची काळजी घेतात. स्त्री गर्भवती असल्यापासूनच ‘आया’ त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतात. जागतिक मातृदिवसाच्या निमित्ताने आईची आठवण प्रत्येकाला होते. मात्र जन्मानंतरच्या नाजुक दिवसांमध्ये साथ देणारी ‘आया’ बहुतेकांच्या स्मरणातदेखील नसते.   रुग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचा सांभाळ स्वत:चे बाळ असल्याच्या काळजीतून करणाऱ्या ‘आया’ पुण्यातल्या सर्व प्रसुतीगृहांमध्ये आहेत. जणू दुसरी आईच.     प्रसुतीनंतर पुढील काही दिवस जन्मदात्या आईच्या हालचालींवर मर्यादा असतात. प्रसुती नैसर्गिक झालेली नसेल तर विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी बाळाची सर्वोतोपरी काळजी घेण्याचे काम आया करतात. प्रसुतीगृहांमध्ये दोन प्रकारच्या आया कार्यरत आहेत. गरोदर अवस्थेत असताना प्रसूती होईपर्यंत आईला डॉक्टरांच्या आणि आयांच्या निगराणीखाली ठेवले जाते. या कालावधीत बाळ पोटात असताना गर्भवतीची काळजी घेण्याचे काम आया करतात. गर्भवतीचा आहार, औषधोपचार, स्वच्छता, वैद्यकीय गरजा यावर आया लक्ष ठेवून असतात.   दुसऱ्या प्रकारच्या आया जन्मलेल्या बाळांचा सांभाळ करतात. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची स्वच्छता करुन त्याला स्वच्छ कापडात ठेवून आईकडे सुपूर्त केले जाते. या क्षणापासून आयांचे काम सुरू होते. बाळाच्या स्वच्छतेपासून, आंघोळ, दूध पाजण्याची वेळ, या सर्वांकडे एका आईप्रमाणे लक्ष देतात. आया एकाच बाळाचा सांभाळ करत नाहीत. एका आयाला दिवसातून नऊ ते दहा बाळांचा सांभाळ करावा लागतो. या दिवसातून तीन शिपमधून काम करतात. रुग्णालयात बारा तास कार्यरत असतात. आयांना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही. नवीन आलेल्या आयांना जुन्या आया काम शिकवतात.  

.............जिथे कमी तिथे ‘आया’बाळाला आणि आईला सांभाळणे हे आयांचे मुख्य काम आहे. परंतु रुग्णालयातील स्वछता, नर्सची कामे, डॉक्टरांना मदत करणे अशा ऐनवेळच्या अनेक कामांना आयांना हातभार लावावा लागतो.  

पाचशेपेक्षा जास्त बाळांचे संगोपनमी गेली २२ वर्षे हे काम करत आहे. बाळांच्या संगोपनाबरोबरच रुग्णालयाची देखभाल आम्ही करतो. आतापर्यंत पाचशे ते सहाशे बाळांचे संगोपन केले आहे. आईच्या भावनेनेच आम्ही हे काम करतो. -अनिता लोहोट पोटच्या मुलासारखे जपतोतीस वर्षात वेगवेगळ्या रुग्णालयात काम केले आहे. बºयाच ठिकाणी चांगले, वाईट, कडु-गोड अनुभव आले. आम्ही सर्व आया एकमेकांना सहकार्य करत असतो. आईला व बाळाला काही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सतत काळजी घेतो. या बाळांचे संगोपन आम्ही स्वत:च्या मुलाप्रमाणे करतो. -मीना शळकंदे

प्रमोशन आणि संरक्षण हवेगेली ९ वर्षे मी रुग्णालयात आया म्हणून काम पाहत आहे.  आमच्या सारख्या गरजू महिलांना आधूनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. ज्येष्ठतेनुसार प्रमोशन करावे.  परिचारिका आणि आया कार्यरत असताना संरक्षण द्यावे. शासकीय सर्व परिचारीकांसमवेत आयांची भरती करावी. -अनिता गवंडे

----(समाप्त)-----

टॅग्स :PuneपुणेMothers Dayमदर्स डे