कुलभूषण यांच्या सुटकेसाठी माता-पित्यांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:54 IST2017-07-19T00:54:06+5:302017-07-19T00:54:06+5:30

आम्हाला आमचा कुलभूषण सुरक्षित हवा. तो घरी परत यावा, इतकीच आमची इच्छा आहे़ त्याच्यासाठी देवांना साकडे घालत फिरतोय, अशा शब्दांत कुलभूषणच्या

Mother's Companion for the release of Kulbhushan | कुलभूषण यांच्या सुटकेसाठी माता-पित्यांचे साकडे

कुलभूषण यांच्या सुटकेसाठी माता-पित्यांचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : आम्हाला आमचा कुलभूषण सुरक्षित हवा. तो घरी परत यावा, इतकीच आमची इच्छा आहे़ त्याच्यासाठी देवांना साकडे घालत फिरतोय, अशा शब्दांत कुलभूषणच्या माता-पित्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या माता अवंती आणि पिता सुधीर जाधव यांनी मंगळवारी सकाळी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचे दर्शन घेतले.
त्यांनी तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतले. सहायक पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झालेले सुधीर जाधव यांचे सोलापूरमधील अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत़ आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन धीर दिला़ कोटणीस स्मारकालाही त्यांनी भेट दिली. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली असता त्यांनी हात जोडत काहीही छापू नका, अशी विनंती केली़

Web Title: Mother's Companion for the release of Kulbhushan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.