मुलाच्या पिंडदानास गेलेल्या आईसह दोन मावस बहिणींचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 08:02 IST2025-06-09T08:01:43+5:302025-06-09T08:02:38+5:30

Gondia News: लहान मुलाच्या पिंडदानासाठी कोरणी घाट येथे गेलेल्या आई व दोन मावस बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मीरा इसूलाल तुरकर (५५), मीनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मिता शत्रुघ्न टेंभरे (३९, तिघी रा.नागपूर), अशी मृत महिलांची नावे आहेत.

Mother, two sisters drown after attending son's Pindadaan | मुलाच्या पिंडदानास गेलेल्या आईसह दोन मावस बहिणींचा बुडून मृत्यू

मुलाच्या पिंडदानास गेलेल्या आईसह दोन मावस बहिणींचा बुडून मृत्यू

गोंदिया - लहान मुलाच्या पिंडदानासाठी कोरणी घाट येथे गेलेल्या आई व दोन मावस बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मीरा इसूलाल तुरकर (५५), मीनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मिता शत्रुघ्न टेंभरे (३९, तिघी रा.नागपूर), अशी मृत महिलांची नावे आहेत.

मीरा तुरकर यांचा लहान मुलगा मुकेश तुरकर याचे ३० मे रोजी आजाराने निधन झाले. पिंडदानासाठी तालुक्यातील कोरणी घाट येथे रविवारी कुटुंबीय आले होते. पूजेपूर्वी अंघोळीसाठी महिला घाटात उतरल्या. मुकेश तुरकरची वहिनी गायत्री राजेश तुरकर या पाय घसरल्याने पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली. चौघी बुडत असल्याचे पाहून पिंडदानाच्या प्रक्रियेतील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गायत्री यांना वाचविण्यात यश आले. इतर तिघींचा बुडून मृत्यू झाला. मीरा तुरकर यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून आणि नातवंडे आहेत. तिघी मृतक गोंदिया जिल्ह्यातील गिरोला-कन्हारटोला येथील मूळच्या रहिवासी आहेत. रोजगाराच्या शोधात त्या नागपूर हिंगणा येथे गेल्याने काही वर्षांपासून तेथेच वास्तव्यास होत्या.

गोदापात्रात बुडालेल्या ६ मुलांचे मृतदेह आढळले
सिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेली सहा मुले बुडाल्याची घटना शनिवारी घडली. 
मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबविल्यानंतर रविवारी त्यांचे मृतदेह आढळून आले. सहाही मृत मुले तेलंगणातील रहिवासी होते. पोलिस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने बोटीद्वारे मुलांचा शोध सुरु केला. सकाळी ७ वाजता मृतदेह नदीपात्रात काही अंतरावर आढळून आले. 

Web Title: Mother, two sisters drown after attending son's Pindadaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात