सहा राज्यांत 'मोस्ट वाँटेड', तीन कोटींचे बक्षीस असलेला माओवादी रवी ठार, महिला माओवादी अरुणाचाही खात्मा 

By संजय तिपाले | Updated: June 18, 2025 12:26 IST2025-06-18T12:25:42+5:302025-06-18T12:26:19+5:30

Naxal Encounter News: गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात माओवादी कारवायांत सहभागी असलेला तसेच सहा राज्यांत धुमाकूळ घालून सुरक्षा यंत्रणेला आव्हान देणारा जहाल माओवादी  गजर्ला रवी ऊर्फ , उदय उर्फ गणेश याला ठार करण्यात १८ जूनला यश आले.

'Most wanted' in six states, Maoist Ravi with a reward of Rs 3 crores killed, female Maoist Aruna also killed | सहा राज्यांत 'मोस्ट वाँटेड', तीन कोटींचे बक्षीस असलेला माओवादी रवी ठार, महिला माओवादी अरुणाचाही खात्मा 

सहा राज्यांत 'मोस्ट वाँटेड', तीन कोटींचे बक्षीस असलेला माओवादी रवी ठार, महिला माओवादी अरुणाचाही खात्मा 

- संजय तिपाले 
गडचिरोली - जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात माओवादी कारवायांत सहभागी असलेला तसेच सहा राज्यांत धुमाकूळ घालून सुरक्षा यंत्रणेला आव्हान देणारा जहाल माओवादी  गजर्ला रवी ऊर्फ , उदय उर्फ गणेश याला ठार करण्यात १८ जूनला यश आले. त्याच्या डोक्यावर तीन कोटींचे इनाम हाेते. आंध्रप्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्याच्या मारडपल्ली जंगलात तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात गजर्ला रवी ऊर्फ गणेशसह महिला माओवादी अरुणाचा समावेश आहे.

गजर्ला रवी ऊर्फ उदय, उर्फ गणेश हा माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. त्याचा खात्मा झाल्याने माओवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे. माओवाद्यांनी केलेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमागे त्याचा हात होता. मूळचा तेलंगणातील रहिवासी असलेल्या रवी उर्फ उदयवर आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि झारखंड या सहा राज्यांमध्ये मिळून तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.रवी माओवाद्यांच्या आंध्रा-ओरिसा बॉर्डर समितीचा सचिव तसेच आंध्र प्रदेश स्पेशल झोनल समितीचा सदस्य म्हणूनही कार्यरत होता. तीन राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये त्याचा मोठा प्रभाव होता. त्याच्यासोबत अरुणालाही जवानांनी ठार केले.  ती माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्याची पत्नी होती. तसेच, ती वरिष्ठ माओवादी नेता चेरकुरी राजकुमार ऊर्फ आझादची बहीण होती. तिच्यावरही ५० लाख रुपयांचे बक्षीस होते.

पहाटेपासून चकमक सुरू
आंध्रप्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यात मारडपल्लीच्या दुर्गम वनक्षेत्रात भागात जवान आणि माओवाद्यांमध्ये १८ जून रोजी पहाटे पाच वाजेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तिसऱ्या माओवाद्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Web Title: 'Most wanted' in six states, Maoist Ravi with a reward of Rs 3 crores killed, female Maoist Aruna also killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.