युती सरकारच्या काळात कुपोषणाने सर्वाधिक मृत्यू; एकनाथ खडसेंचा घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:25 IST2019-06-20T04:51:07+5:302019-06-20T06:25:34+5:30
युती सरकारच्या कारभारावर एकनाथ खडसेंची टीका

युती सरकारच्या काळात कुपोषणाने सर्वाधिक मृत्यू; एकनाथ खडसेंचा घरचा अहेर
मुंबई : भाजप-शिवसेना युती सरकारच्या पाच वर्षांत कुपोषणाने सर्वाधिक आदिवासी बालकांचे मृत्यू झाले, असा घरचा अहेर एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानसभेत दिला.
आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या मागण्यांबाबतचा प्रश्न शिवसेनेचे योगेश घोलप यांनी उपस्थित केला होता. त्यावर खडसे यांनी नवे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळांच्या संचालनासाठीची संहिता तीन वर्षांपासून तयार आहे, पण ती लागू केलेली नाही. आश्रमशाळांच्या पहारेकऱ्यांना २४ तासांची ड्युटी दिली जाते, पण दरमहा पाच हजार रुपये दिले जातात. या पहारेकऱ्यांचे मानधन वाढविण्याचा निर्णय केव्हाच झाला आहे, पण निर्णय होत नाही. घेतलेले निर्णय अंमलात येत नाहीत. गेल्या पाच वर्षांत आदिवासी बालकांचे सर्वाधिक मृत्यू राज्यात झाले आहेत. अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय सात दिवसांच्या आत घेण्यात येईल. पहारेकºयांच्या मानधन वाढीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल, असे उईके यांनी सांगितले.