शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या ड्रॉप बॉक्समध्ये ९ लाखांहून अधिक विद्यार्थी; 'शाळाबाह्य'ची संख्या लाखात; सर्वाधिक ठाण्यात

By सीमा महांगडे | Updated: January 10, 2025 08:04 IST

काय आहे ‘ड्रॉप बॉक्स’ संकल्पना? जाणून घ्या सविस्तर

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळांमध्येशाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जाते, मात्र त्यात समोर येणारे प्रमाण हे अगदी नगण्य असते. या उलट शिक्षण विभागाच्याच स्टुडंट पोर्टलवर नोंद असणारी शाळाबाह्य मुलांची आकडेवारी लाखांत असल्याचे समोर आले आहे. तर ड्रॉप बॉक्समध्ये तब्बल ९ लाख ७५ हजार आहेत. सर्वाधिक शाळाबाह्य मुले ठाणे आणि पुण्यात आहेत.

निरंतर शिक्षण पद्धतीमध्ये एका वर्गातील विद्यार्थी हे दुसऱ्या वर्गात जाताना पटसंख्या शक्यतो वाढायला हवी किंवा तीच राहायला हवी, परंतु ती कमी असल्यास, बाहेर पडलेले विद्यार्थी नेमके कुठे गेले याचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून मिशन ड्रॉप बॉक्स ही मोहीम राबवली जाते. 

नुकत्याच शिक्षण विभागाकडून शाळा आणि मुख्याध्यापकांना ड्रॉप बॉक्स शून्यावर आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ड्रॉप बॉक्स शून्यावर आणण्यात बऱ्याच अडचणी असून, ते प्रत्यक्षात शक्य नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून नोंदीसाठी पर्याय सूचवणे आवश्यक असल्याचे मत यातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

काय आहे ‘ड्रॉप बॉक्स’?

  • इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व यंदा पुढील वर्गातील विद्यार्थ्यांची पटसंख्या काढली जाते.
  • मागील वर्षी जेवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तेवढ्याच विद्यार्थ्यांची पटसंख्या पुढील वर्गात असणे आवश्यक आहे. मात्र, ती मागील वर्षाच्या कमी आढळल्यास कोणत्या कारणामुळे या विद्यार्थ्यांची नोंद होऊ शकली नाही, याची माहिती शिक्षण विभागाला असणे अपेक्षित आहे.
  • विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला किंवा शिक्षण सोडले, दैनंदिन शाळेऐवजी इतर माध्यमातून शिक्षण घेतले किंवा त्यांचे दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरण झाले, याचा शोध घेण्याच्या मोहिमेला ‘मिशन ड्रॉप बॉक्स’ हे नाव देण्यात आले आहे.

ड्रॉप बॉक्स शून्यावर आणताना अडचणी येत असून, यासाठी निश्चित उपाय योजना आवश्यक आहेत. विद्यार्थी इतर शाळेत प्रवेश घेईपर्यंत तो ड्रॉप बॉक्समध्ये दाखवू नये किंवा निश्चित महिन्यांच्या कालावधीनंतर तो काढून टाकण्याची परवानगी शिक्षण विभागाने शाळांना द्यावी. यामुळे शाळांचा ड्रॉप बॉक्स शून्यावर आणता येणे शक्य होऊ शकेल.- संजय पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना, मुंबई

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाGovernmentसरकारEducationशिक्षण