शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वर्षात दीड लाखांहून अधिक चालक अपघातात मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 11:03 IST

दरवर्षी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ

ठळक मुद्देसर्वाधिक अपघात राष्ट्रीय महामार्गावर : १८ ते ३५ वर्षे वयोगटात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त२०१८ वर्षातील अपघात व अपघातातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध

पुणे : वाहतूक नियमांचे पालन करून वाहन चालविणाऱ्यांच्या तुलनेत अद्याप बेकायदेशीरपणे वाहन चालवत अपघातास बळी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून यामुळे प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून शिस्तीचे पालन करण्याची गरज अपघाताची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येते. भारतात मागील वर्षी तब्बल १ लाख ५१ हजार ४१७ व्यक्तींचा वाहन अपघातात मृत्यू झाला असून ४ लाख ६९ हजार ४१८ व्यक्ती त्या अपघातांमध्ये गंभीर जखमी झाल्या आहेत. एकूण अपघातांची संख्या ४ लाख ६७ हजार ०४४ इतकी आहे.  सेव्ह लाइफ फाउंडेशनच्यावतीने २०१८ वर्षातील अपघात व अपघातातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याकरिता संस्थेने रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून यासंबंधीची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या आकडेवारीनुसार, २०१७ च्या तुलनेत अपघातात मृत्युमुखी पडणाºयांची संख्या ३५०० तर अपघातांची संख्या २ हजार १३० ने वाढली आहे. भारतात दिवसाला वाहतूक अपघातात ४१५ जणांचा मृत्यू तर १ हजार २८० अपघात होत आहेत. तसेच दरतासाला १७ जणांचा मृत्यू वाहन अपघातात होत असल्याची माहिती या अहवालातून पुढे आली आहे. सर्वाधिक अपघात होणाऱ्या राज्यांत तमिळनाडूचा क्रमांक वरचा असून १३ टक्के वाहन धडकेच्या तक्रारीची नोंद या राज्याच्या नावावर झाली आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश (११%), उत्तर प्रदेश (९.१%) यांचा क्रमांक आहे. तसेच रस्त्यावर वाहनधडक होऊन त्यात मृत्युमुखी पडल्याची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशात आहे.  त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक असून महाराष्ट्रातील वाहनधडकेत मृत्युमुखी पडणाºयांची टक्केवारी ८.८ % एवढी आहे. वय वर्षे १८ ते ३५ या वयोगटात अपघाताचे प्रमाण व अपघातात मृत्युमुखी पडणाºयांची संख्या सर्वात जास्त आहे. या वयोगटातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी ४८% असून त्यानंतर वय वर्षे ३५ ते ४५ (२१.६%), ४५ ते ६० वर्षे (१५.१%), ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक (६%) तर १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील अपघाताची टक्केवारी (६.६%) असल्याचे वाहतूक अहवालात नमुद करण्यात आले आहे.  राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण लक्षणीय असून ५४ हजार ०४६ मृत्यु राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. तसेच राज्य महामार्ग ४० हजार ५८० मृत्यु तर इतर रस्त्यांवर ५६ हजार ७९१ मृत्यु झाल्याची नोंद वाहतूक विभागाकडून घेण्यात आली आहे. .........अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे स्त्री आणि पुरुष असे वर्गीकरण केले असता त्यात अपघातात सर्वाधिक प्रमाणात जीव गमावण्यात पुरुषांची संख्या १ लाख ३० हजार १४४ (८६%) इतकी आहे. त्या तुलनेत स्त्रियांची संख्या २१ हजार २७३ (१४%) एवढी आहे. ......हेल्मेट परिधान न केल्यामुळे ४३ हजार ६१४ जणांना आपले प्राण गमवावे लागेल असून सीट बेल्ट न लावल्यामुळे २४ हजार ४३५ वाहनचालक मृत्युमुखी पडले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या मालगाड्यांमुळे जवळपास १२ टक्के वाहनचालकांना मृत्यू आला असून १० टक्के गाड्यांचा एकमेकांवर आदळल्याने अपघात घडला आहे. ........हिट अँड रन या प्रकरणात एकूण ६९ हजार ८२२ तक्रारींची नोंद झाली. त्यात २८ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित ६१ हजार ९८८ जण त्या अपघातात जखमी झाले आहेत. या आकडेवारीची २०१७ च्या आकडेवारीशी तुलना केल्यास यंदा हिट अँड रनच्या तक्रारीत ७.१ टक्क्यांंनी वाढ झाली असून त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ११ % टक्क्यांनी वाढली आहे. देशातील प्रमुख १५ राज्यांतील अपघातांची आकडेवारी राज्ये                                अपघात                            मृत्युमुखी  उत्तर प्रदेश                       42568                               22256महाराष्ट्र                           35717                               13261तमिळनाडू                        63920                             12216कर्नाटक                           41707                               10990मध्य प्रदेश                       51397                              10706राजस्थान                         21743                             10320गुजरात                            18769                             7996आंध्र प्रदेश                        24475                             7556बिहार                              9600                              6729तेलंगणा                          22230                             6603पश्चिम बंगाल                12705                               5711 ओडिशा                         11262                              5315हरियाणा                       11238                               5118पंजाब                           6428                               4740  छत्तीसगढ                   13864                             4592 एकूण                           387623                          134109 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग