शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

राज्यात मान्सूनचे आगमन २४ जूनला; हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 4:35 AM

मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस

मुंबई : ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असल्याने, मंगळुरू येथे स्थिरावलेले नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय झाला असून, पुढील चार ते पाच दिवसांत म्हणजेच २४ ते २५ जूनला मान्सूनचे राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.१ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित असताना मोसमी वारे एक आठवडा उशिराने पोहोचले. मात्र, मध्येच धडकलेल्या ‘वायू’ या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या मार्गात अडथळा निर्माण केला. सध्या मान्सून कर्नाटकातील मंगळुरूमध्ये स्थिरावला आहे, तर चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे.दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता असून, तो कर्नाटकासह, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, दक्षिण कोकणातील काही भाग, गोवा या ठिकाणी येण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़ येत्या २४ ते २५ जूनला मान्सूनचे राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे.उद्या कोकण, गोव्यात मुसळधार१९ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असेल़ विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़ २० व २१ जून रोजी विदर्भात उष्णतेची लाट असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘वायू’ चक्रीवादळाचा तीव्रता कमी झाली असून, त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाले आहे़ ते मध्यरात्री ते उत्तर गुजरातला धडक देण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Rainपाऊस