शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मॉन्सून सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 20:51 IST

शुक्रवारपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे़.

ठळक मुद्देआणखी तीन दिवस पावसचा जोर राहणार

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला़. पुढील तीन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे़. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील वेंगुर्ला ११०, मालवण १००, , देवगड ९०, पणजी, रामेश्वरवाडी ८०, भिवंडी, दापोली, दोडामार्ग, हर्णे ४०, भिरा, गुहागर, मंडणगड, मुंबई (कुलाबा) ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़. तसेच कोकणात सर्वत्र मध्यम ते हलका पाऊस झाला़. मध्य महाराष्ट्रात सटना बागलान १००, बारामती, माळशिरस ७०, सिन्नर ६०, देवळा, जेऊर, फलटण ५०, चंदगड, चांदवड, दौंडद्व नंदूरबार, निफाड, संगमेश्वर, शिरपूर ४०, जामखेड, मालेगाव, पुणे ३०, आजरा, अकोले, गिरना धरण, हसुल, इगतपुरी, कळवण, माढा, ओझर, सांगोला, शहादा, त्र्यंबकेश्वर, वाई, यवत २० मिमी पाऊस झाला़. मराठवाड्यात बिलोली ९०, उदगीर ७०, तुळजापूर ६०, धर्माबाद, उमरी ५०, भुम, देवणी ४०, अंबड, कंधार, नायगाव, खैरगाव, नांदेड ३०, अहमदपूर, औसा, देगलुर, कळंब, लोहा, लोहारा, मुखेड, फुलांबरी, शिरुर, अनंतपाल, सोनपेठ २०, औंढ्या नागनाथ, बदलापूर, धनसावंगी, जाळकोट, मुदखेड, परतूर, पूर्णा, रेणापूर, वस्मत १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ विदर्भात देवरी ४०, आष्टी ३०, अमरावती, भिवपूर, हिंगणा, कोर्ची, मुर्तिजापूर, नागपूर, नांदूरा, सिरोंचा, उमरेड २०, अर्जुनी मोरगाव, बाळापूर, बार्शी टाकळी, बुलढाणा, चिमुर, धनोरा, इटापल्ली, कळमेश्वर, काटोल, खारंघा, कुरखेडा, मलकापूर, मोर्शी, पातूर, पौनी, सडक अर्जुनी, सालेकसा, वर्धा, वरुड १० मिमी पाऊस झाला होता़ घाटमाथ्यावरील डुंगरवाडी ५०, ताम्हिणी २, अम्ंबोणे, खोपोली १० मिमी पाऊस पडला़.

 सध्या मॉन्सूनचा जोर केरळमध्ये कमी झाला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी, तेलंगणा, कर्नाटकची किनारपट्टी येथे मॉन्सून सक्रीय आहे़. २१ ते २४ जुलै ला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बºयाच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ........इशारा : २१ जुलैला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़, २२ व २३ जुलैला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधाऱ २४ जुलैला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलFarmerशेतकरीagricultureशेतीweatherहवामान